शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्राच्या खांबाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 21:27 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा येथे वीजपुरवठा करणार्या रोहित्राच्या विद्युत खांबांची दयनीय दुरवस्था झाली आहे. हे ठिकाण अपघात प्रवण बनले आहे. यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दखल घेत त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देगावठा परिसर : महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा येथे वीजपुरवठा करणार्या रोहित्राच्या विद्युत खांबांची दयनीय दुरवस्था झाली आहे. हे ठिकाण अपघात प्रवण बनले आहे. यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दखल घेत त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावठा येथे असलेल्या रोहित्राजवळच काही घरे व शेतीही आहे. या भागात अबालवृद्धांचा वावर असतो. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या विद्युत खांबांची दयनीय अवस्था झाली आहे. या खांबांना छिद्र पडले आहे. या रोहित्राला वीजवाहक तारांमुळे आधार आहे. मात्र तारा बाजुला झाल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जोरदार वाºयाच्या झोतात पडून जाण्याचीही भीती ग्रामस्थांना वाटत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे ग्रामस्थांनी अनेकदा तक्रार करुनही त्याकडे संबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.गावाला वीजपुरवठा होत असलेल्या रोहित्राच्या खांबांची दुरवस्था झाली असून अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने तत्काळ दुरुस्ती करायला हवी. मात्र, अनेकदा तक्रार करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.- जगन लहारे, ग्रामस्थ गावठा या रोहित्राच्या दयनीय अवस्थेतबाबत संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण? तसेच खांब फक्त वीजतारांच्या भरवश्यावर आहेत. ते कधीही कोसळू शकतात.त्यामुळे तत्काळ दुरुस्ती करावी.- दिनेश लहारे,सामिजक कार्यकर्ते, गावठा

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज