शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
4
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
5
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
6
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
7
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
8
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
9
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
10
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
11
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
12
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
13
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
14
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
16
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
17
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
18
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
19
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
20
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार

जिल्हा परिषदेच्या गटांची रचना दीड महिन्यात

By admin | Updated: August 20, 2016 01:37 IST

निवडणुकीचे पडघम : गट, गणांची संख्या कायम

नाशिक : फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाने गट व गणांच्या पुनर्रचनेचा कार्यक्रम जाहीर केला असून, ९ सप्टेंबरपर्यंत तहसीलदारांना आपापल्या तालुक्यातील गट व गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्णात नवीन नगरपंचायतींच्या निर्मितीनंतर गट, गणाच्या संख्येत घट होण्याची व्यक्त होणारी भीती निरर्थक असून, फक्त सात तालुक्यांमधील गट व गणांच्या रचनेत मोठा बदल होवून सदस्यांची संख्या मात्र पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांबरोबरच पंधराही पंचायत समित्यांचीही मुदत फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येत आहे, तत्पूर्वीच नवीन सदस्यांची निवड करणे क्रमप्राप्त असल्याने त्याच्या प्रशासकीय तयारीला राज्य निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. प्रत्येक गट व गणाची पुनर्रचना तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणातही बदल होणार आहे.होऊ घातलेल्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्यांपैकी ३७ जागा म्हणजेच ५० टक्के यंदा पहिल्यांदाच महिलांसाठी राखीव राहणार आहेत, तीच परिस्थिती पंचायत समित्यांमध्ये म्हणजेच गणांच्या निवडणुकीत राहणार आहे. या गट व गण रचनेसाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार असल्याने साधारणत: ४२ हजार मतदारांचा समावेश गटाच्या रचनेत करण्यात येणार आहे. तहसीलदारांनी ९ सप्टेंबर रोजी प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करावा, अशा सूचना असून, २३ सप्टेंबरपर्यंत विभागीय आयुक्तांनी या प्रस्तांवाची छाननी करून त्यास मान्यता देणे व ५ आॅक्टोबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर गट, गणाची रचना व आरक्षणाबाबत हरकती नोंदविण्याचीही संधी उमेदवारांना देण्यात आली आहे.  (प्रतिनिधी)