शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटसह चार मैदानांची कामे पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:49 IST

सिन्नर : शिर्डी मार्गालगत मुसळगाव शिवारात ५० एकर क्षेत्रावर तालुका क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. तालुका क्रीडा संकुल समितीचे ...

सिन्नर : शिर्डी मार्गालगत मुसळगाव शिवारात ५० एकर क्षेत्रावर तालुका क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष, आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या या क्रीडा संकुलाच्या कामांची आढावा बैठक पार पडली. क्रिकेट, कबड्डी, खो-खो आणि व्हाॅलीबॉलचे मैदान आसन व्यवस्थेसह पूर्ण झाले असल्याची माहिती तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी दिली. क्रिकेट पॅव्हेलियनचा पहिला व दुसरा मजला, प्रसाधनगृहे, संकुलाची संरक्षक भिंत आदी कामेही पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार राहुल कोताडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. के. पाटील, शाखा अभियंता डी. के. बोडके, वास्तुविशारद अश्फाक अबुजीवाला, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पी. एम. बिब्बे, मुसळगावचे ग्रामविकास अधिकारी पी. एस. बावीस्कर, विजय कोकाटे, अरुण भरीतकर आदी उपस्थित होते.

-----------

२०० मीटर रनिंग ट्रॅकचा बेस पूर्ण झाला आहे. तथापि, कोकाटे यांनी ४०० मीटर रनिंग ट्रॅकचा प्रस्ताव मांडल्याने तिथे हॉकीचे मैदान प्रस्तावित करण्यात आले. पॅव्हेलियनचा वरचा मजला, पोटमाळा, बाह्य आणि अंतर्गत विद्युतीकरण आदी कामांचा आमदार कोकाटे यांनी आढावा घेतला. पॅव्हेलियनच्या कामासाठी ठेकेदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ट्रान्स्फॉर्मर उभारणीचा खर्च तालुका क्रीडा संकुल समितीने उपलब्ध करून देण्याचे ठरले. हा प्रश्‍न निकाली लागला.

------------------

‘अतिक्रमणधारकांशी समन्वयाने तोडगा काढा’

तालुका क्रीडा संकुलाच्या हद्दीत काही अतिक्रमण झालेले आहे. तथापि, त्यांना घरकुले मंजूर करून द्यावीत. त्यांचे संसार उघड्यावर आणू नका, चर्चा करून समन्वयाने तोडगा काढावा, अशा सूचना कोकाटे यांनी तहसीलदार कोताडे यांना केल्या. तत्काळ कार्यवाही सुरू करणार असल्याचे कोताडे म्हणाले.

-------------------

सिन्नर येथे आढावा बैठकीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार राहुल कोताडे, ए. के. पाटील, डी. के. बोडके, अश्फाक अबुजीवाला, मधुकर मुरकुटे, पी. एम. बिब्बे आदी उपस्थित होते. (३० सिन्नर ३)

===Photopath===

300121\30nsk_11_30012021_13.jpg

===Caption===

३० सिन्नर ३