तक्रार : रहिवासी जागेचा विनापरवाना व्यावसायिक वापर अंबडच्या नऊ भंगार व्यावसायिकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:10 AM2017-12-24T01:10:18+5:302017-12-24T01:10:36+5:30

नाशिक : महापालिकेचे रहिवासी वापराचे आरक्षण असताना त्यावर विनापरवाना व्यावसायिक दुकाने थाटून भंगारचा व्यवसाय करणाºया नऊहून अधिक भंगार व्यावसायिकांविरोधात महापालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार अंबड पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व गृहरचना अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़

Complaint: Unauthorized commercial use of resident land, crime against nine scam professionals | तक्रार : रहिवासी जागेचा विनापरवाना व्यावसायिक वापर अंबडच्या नऊ भंगार व्यावसायिकांवर गुन्हा

तक्रार : रहिवासी जागेचा विनापरवाना व्यावसायिक वापर अंबडच्या नऊ भंगार व्यावसायिकांवर गुन्हा

Next

नाशिक : महापालिकेचे रहिवासी वापराचे आरक्षण असताना त्यावर विनापरवाना व्यावसायिक दुकाने थाटून भंगारचा व्यवसाय करणाºया नऊहून अधिक भंगार व्यावसायिकांविरोधात महापालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार अंबड पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व गृहरचना अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी भरारी पथकातील कर्मचारी महेंद्रकुमार दिनकर पगारे (५३) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर-अंबड लिंक रोडवर महापालिकेने केवळ रहिवासी वापराची मुभा असून, नगररचना विभागाने हा परिसर रहिवासी वापराकरिता असल्याचे अधिकृत केले आहे़ असे असताना महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना अनधिकृतपणे बांधकामे व रहिवासी ठिकाणाचा वापर भंगार मालाच्या दुकानांसाठी केला़ विशेष म्हणजे महापालिकेने वारंवार नोटिसा देऊनही भंगार व्यावसायिकांनी त्यांची दुकाने सुरूच ठेवली़

Web Title: Complaint: Unauthorized commercial use of resident land, crime against nine scam professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.