शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरला महावितरणच्या विरोधात तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:31 IST

इंदिरानगर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तो सुरळीत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले.

इंदिरानगर : इंदिरानगर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तो सुरळीत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदारदेवयानी फरांदे यांनी केले.परिसरातील महावितरण कंपनीकडून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्यासंदर्भात महावितरण कंपनीचे अधिकारी व नागरिकांच्या बैठकीचे आयोजन प्रभाग क्रमांक २३ व ३० च्या नगरसेवकांनी अजय मित्रमंडळाच्या सभागृहात केले होते त्यावेळी बोलत होत्या. यावेळी सुमारे सहा ते सात महिन्यांपासून नासर्डी ते राजीवनगर दरम्यान नेहमीच होणाºया विजेचा लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच पाऊस सुरू होण्यापूर्वीच विद्युत पुरवठा खंडित होतो. महापालिकेच्याकडे तक्रार करूनसुद्धा वृक्षाच्या फांद्या छाटल्या जात नाहीत यांसह विविध तक्रारींचा पाढा वाचून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी बैठकीत धारेवर धरले होते. यावेळी फरांदे म्हणाल्या की, जिल्हा नियोजनचा निधी उपलब्ध करून देत असून तातडीने नागरिकांच्या समस्या सोडवा अशी सूचना केली तसेच परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.प्रास्ताविक करताना नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता मोहिते नगरसेवकांचेसुद्धा फोन उचलत नाही, अशी तक्रार केली. व्यासपीठावर आमदारदेवयानी फरांदे, नगरसेवक सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, चंद्रकांत खोडे, अ‍ॅड. श्याम बडोदे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा यांसह महावितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.गेल्या सात दिवसांपूर्वी काही भागात चोवीस तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना उकाड्यामुळे रात्र जागून काढावी लागली. तसेच बहुतेक ठिकाणी डीपी उघड्या असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भूमिगत विद्युत तारा कधी होणार ? तसेच वीज बिल भरण्याची तारीख निघून गेल्यानंतर वीज बिले मिळत आहेत. याबाबत काय कारवाई करणार अशी विचारणा करण्यात आली़

टॅग्स :electricityवीजMLAआमदारDevyani Farandeदेवयानी फरांदे