शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

टोकडे येथे गॅस सिलिंडर वाटपात अपहाराची तक्रार

By admin | Updated: August 4, 2014 00:42 IST

टोकडे येथे गॅस सिलिंडर वाटपात अपहाराची तक्रार

 

मालेगाव : तालुक्यातील टोकडे येथे आदिवासींना वनसमितीच्या माध्यमातून वाटण्यात येणाऱ्या गॅस शेगड्या व सिलिंडरच्या वितरणात अपहार करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाऊलाल निमडे व संजय रंधवा यांनी जिल्ह्याच्या मुख्य वनाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्यात वनविभागामार्फत अवैध जंगलतोड थांबविण्यासाठी वनसमितीच्या माध्यमातून आदिवासींना गॅस सिलिंडर व शेगड्यांचे वाटप केले जाते. तालुक्यातील टोकडे येथे या योजनेत लाभार्थींकडून प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले असून, त्यांना गॅस शेगडी व सिलिंडरचे वाटप करण्यात आलेले नाही. त्याऐवजी वनसमितीने अपहार करत मोठ्या रकमा घेऊन नियमबाह्य पद्धतीने वाटप केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यात वनसमितीने एकाच घरातील अनेक व्यक्तींच्या नावावर गॅसचे वितरण केले असून, यात लहान मुलांच्या नावांचा समावेश आहे. समितीनी हे वाटप करताना लाभार्थी व ग्रामपंचायत यांची मंजूर घेणे आवश्यक असताना ती घेण्यात आलेली नाही. या विषयी वनाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी समितीला लाभार्थ्यांचे पैसे परत करण्यास सांगितले होते. मात्र समितीने अद्याप पैसे दिलेले नाहीत. या प्रकरणातील अपहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आकाश गायकवाड, अमोल गायकवाड, मोहन सोनवणे, गणेश गायकवाड, श्रीराम वाघ आदिंसह २५ लाभार्थ्यांच्या सह्या व अंगठे आहेत.