फटाके फोडणे महापौरांना भोवणार, न्यायालयाचा अवमान झाल्याची पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 14:29 IST2018-11-23T14:28:38+5:302018-11-23T14:29:59+5:30
तुकाराम मुंढे यांना बदलीचे पत्र मिळताच त्यांनी आपले आयुक्त कार्यालय सोडले. मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडल्याची बातमी कळताच

फटाके फोडणे महापौरांना भोवणार, न्यायालयाचा अवमान झाल्याची पोलिसात तक्रार
नाशिक - धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केली. मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडताच महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या बंगल्यासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. मात्र, आता कार्यकर्त्यांचया या आतातायीपणामुळे महापौर रंजना भानसी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात रंजना भानसी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे.
तुकाराम मुंढे यांना बदलीचे पत्र मिळताच त्यांनी आपले आयुक्त कार्यालय सोडले. मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडल्याची बातमी कळताच, नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या बंगल्याबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या बंगल्याबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला होता. मात्र, या महापौरांच्या या कृतीविरुद्ध मुंढे समर्थक एकवटले आहेत. मुंढे समर्थकांनी महापौर रंजना भानसी यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दुपारी 12 ते 1 या वेळेत फटाके फोडून महापौरांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच मुंढे समर्थकांनी नाशिक महापालिकेसमोर भाजपविरुद्ध घोषणाबाजी केली.
दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनीही मुंढेंच्या बदलीवर समाधान व्यक्त केल आहे. नगरसेवकांसोबत मुंढेचा वाद असल्याचे मान्य करताना, नगरसेवकांनी केलेली कामे मुंढेंनी रद्द केल्याचं भानसी यांनी म्हटले. तसेच मुंढेंच काम हे हिटलरशाहीप्रमाणे सुरू होते, त्यामुळे आम्ही त्यांच्या बदलीची मागणी केली होती, असेही भानसी यांनी म्हटले होते.