शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात शेतीकामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:06 PM

इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावली. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी करत भाताच्या इंद्रायणी, आठ चोवीस, गरे, हळे, पूनम, सोनम, रूपाली, एक हजार आठ अशा नामवंत भाताच्या वाणांच्या रोपांची पेरणी केली.

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावली. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी करत भाताच्या इंद्रायणी, आठ चोवीस, गरे, हळे, पूनम, सोनम, रूपाली, एक हजार आठ अशा नामवंत भाताच्या वाणांच्या रोपांची पेरणी केली.या सोबतच उडीद, सोयाबीन, भुईमूग, खुरासणी आदी पिकांसोबत शेतकऱ्यांनी बागायती भाजीपाला पिकांची जोरात लागवड केली होती; परंतु जूनच्या सुरु वातीलाच वरुणराजाने दमदार हजेरी लावल्यानंतर आजपर्यंत पाऊसच पडला नाही, या कारणास्तव तालुक्यातील शेतकरी राजा हवालदिल झाला. अनेक शेतकºयांची जून, जुलै, आॅगस्टपर्यंत केवळ पावसाच्या पाण्यावाचून भाताची रोपे कडाक्याच्या उन्हामुळे पिवळी झाली व अनेकांच्या भाताच्या रोपांचे नुकसानही झाले, तसेच अनेक शेतकºयांनी शेतात पिकांसाठी भरमसाठ खर्च करूनही त्यांना केवळ पावसाच्या पाण्यावाचून आजपर्यंत भात लागवड करता आली नाही.मात्र इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरातील भाताची लागवड अद्यापही झालेली नव्हती. शेतकºयाला तब्बल तीन महिने पावसाची प्रतीक्षा करावी लागली. टाकेद परिसरातील अनेक गावातील शेतकरी, वारकºयांनी चक्क पाऊस पडावा म्हणून दिंडी काढून हरिनामाचा जयघोष करीत टाकेद येथील सर्वतीर्थावर जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांना साकडेदेखील घातले होते. दोन दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली अन् भात लागवडीसाठी शेतकºयांची तारांबळ उडाली.बुधवारी (दि. १२) मध्यरात्रीपासून टाकेद परिसरात बरसत राहिलेल्या मुसळधार पावसाने दमदार सुरु वात केल्याने इगतपुरीसह टाकेद परिसरातील नद्या, नाले, ओहळ वाहायला सुरु वात झाली आहे.या दोन दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी भाताच्या लागवडीवाचून बेरोजगार होऊन घरी बसून रोजगाराच्या शोधार्थ असलेला मजूर वर्ग आज पुन्हा शेतातील कामांत व्यस्त झाला आहे. जणू काही दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे शेतकºयांनी व रोजंदारीने शेतात काम करणाºया मजूर वर्गाने मोकळा श्वास घेतला. टाकेद परिसरात भाताची लागवड करण्यासाठी शेतकºयांची लगबग तर अनेक शेतकरी विहिरीच्या पाण्यावर लागवड केलेल्या भात शेतीला खतांचा मारा करताना दिसत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी