नाशिक : नांदुरनाक्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात भुजबळ नॉलेज सिटीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ अर्जुन प्रवीण सराफ (वय २२, जनकी अपार्टमेंट, दत्तमंदिराच्या मागे, तरण तलावामागे, नाशिकरोड) हा भुजबळ नॉलेज सिटीत शिक्षण घेतो़ बुधवारी सकाळी तो नेहेमीप्रमाणे पल्सर दुचाकीने (एमएच १५, सीयू १४७६) महाविद्यालयात जात होता़ सकाळी आठ वाजेच्या सुमारास नांदुरनाक्याजवळील महापालिका शाळेजवळ त्यास भरधाव दुचाकीने धडक दिली़ यामध्ये त्याचे डोके व तोंडास जबर मार लागल्याने १०८ अॅम्ब्युलन्सने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायकवाड यांनी तपासून त्याला मयत घोषित केले़ या प्रकरणी आडगाव ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुचाकींच्या अपघातात महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू
By admin | Updated: April 9, 2015 00:28 IST