शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्हाधिकारी कार्यालयातील बेकायदा वृक्षतोडीची पाठराखण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 1:25 AM

जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानात असलेले पुरातन गुलमोहराचे झाड शासकीय सुटीच्या दिवशी गुपचूप तोडण्यात आल्याची बाब ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सदरचे झाड उन्मळून पडल्यामुळे तोडण्यात आल्याचा खुलासा केला

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानात असलेले पुरातन गुलमोहराचे झाड शासकीय सुटीच्या दिवशी गुपचूप तोडण्यात आल्याची बाब ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सदरचे झाड उन्मळून पडल्यामुळे तोडण्यात आल्याचा खुलासा केला तर महापालिकेच्या उद्यान विभागानेही झाड धोकादायक असल्यामुळे तोडण्यात आले, त्यात परवानगी घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचा दावा केला. जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेने संगनमताने ज्या गुलमोहराच्या झाडाची कत्तल केली त्याची वस्तुस्थिती पाहता, झाडाची एक बाजू कलंडल्यामुळे ते कापण्यास कोणाची हरकत नसावी परंतु त्याच झाडाची दुसरी  बाजू भक्कम व त्याचा बुंधा जमिनीत घट्ट रुतलेला असतानाही या झाडाची संपूर्ण कत्तल करण्यात आली.  झाड अशा पद्धतीने कापण्यात आले की परत त्याला पालवी फुटून त्याने उभारी घेऊ नये याची काळजी घेण्यात आली. याच झाडाला लागून आंब्याचे दोन वृक्ष धडधाकटपणे उभे असताना व ते नजीकच्या काळात उन्मळून पडण्याची कोणतीही शक्यता नसताना या झाडावरही झडप घालण्यात आली आहे.कत्तलीमागचे षडयंत्रएकी झाडाची मधोमध कत्तल करण्यात आली असून, दुसऱ्या झाडाच्या साली कुºहाडीचे छाटण्याचे कृत्य करण्यात आले आहे. जेणेकरून गुलमोहराच्या झाडाप्रमाणे या झाडांचेही आयुष्य कमी करण्याचा प्रताप दोन्ही यंत्रणांनी केला आहे. त्याबाबत मात्र कोणताही खुलासा न करता सोयीस्कर मौन पाळण्यात आल्यामुळे गुलमोहराच्या झाडाच्या कत्तलीमागचे षडयंत्र लपून राहिलेले नाही.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयforestजंगलNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका