शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पाचच दिवसात कोसळले काम

By admin | Updated: March 5, 2017 00:43 IST

खामखेडा : कडवा धरण उपविभाग अंतर्गत सुळे डाव्या कालव्यावर पिळकोस शिवारात बांधण्यात येत असलेल्या सायपन कॉँक्रीट विहिरीचे काम अवघ्यात पाच दिवसात कोसळ्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

खामखेडा : कडवा धरण उपविभाग अंतर्गत सुळे डाव्या कालव्यावर पिळकोस शिवारात बांधण्यात येत असलेल्या सायपन कॉँक्रीट विहिरीचे काम अवघ्यात पाच दिवसात कोसळ्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कडवा धरण उपविभागअंतर्गत सुळे डाव्या कालव्याचे कालवा तसेच वितरकांच्या रेंगाळलेल्या कामामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. आठ वर्षे उलटूनही कालव्याला हक्काचे आवर्तन मिळत नाही. त्यातच कालव्याच्या सुरू असलेल्या कामात संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारांचे चांगलेच उखळ पांढरे होत आहे. सदर कालव्यास पिळकोस शिवारातून निघालेल्या वितरिका क्रमांक आठचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. पाच वर्षांपासून सुरू असलेले काम आजमितीसही पूर्णत्वास नाही. या वितरिकेचे फांगदर रस्त्याला लागून असलेल्या गट नंबर १३५ मधील नाल्यावर पाइप असल्याने येथील शेतकऱ्यांना ये - जा करण्यासाठी अडथळा ठरत होते. त्यामुळे या नाल्यावर सायपन करण्यात आले. या सायपनसाठी पाइपच्या दोघा बाजूस असणाऱ्या कॉँक्र ीट विहिरींचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अवघ्या चार पाच दिवसातच पूर्व बाजूची विहीर आपोआप कोसळली. या ठिकाणी विहिरींच्या बांधकामात लोखंडाचा वापर न करता संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराकडून फक्त सिमेंट व वाळू खडीचा वापर केल्याने जमिनीपासून वर असलेल्या दहा फूट उंच बांधकाम आठवडाभरात कोसळले आहे. खामखेडा येथील काळखडी ते फांगदर रस्त्यालगत असलेल्या नाल्यातील वितरिका क्रमांक आठचे काम आपोआप कोसळल्याने संबंधित विभागाने केलेल्या दुर्लक्षाचे व ठेकेदारावरील मेहरबानीचे ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित कामाच्या चौकशीची मागणी केली आहे. (वार्ताहर)