शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
3
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
4
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
5
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
6
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
7
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
8
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
9
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
10
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
11
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
12
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
13
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
14
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
15
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
16
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
17
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
18
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
19
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
20
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात थंडीचा कडाका कायम

By admin | Updated: January 13, 2017 01:37 IST

नीचांक : किमान तपमान ६.००

नाशिक : राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून अग्रस्थानावर कायम आहे. किमान तपमानात सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे नाशिककरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत असून, गुरुवारी (दि. १२) नाशिकची राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून पुन्हा नोंद करण्यात आली आहे.
गेल्या बुधवारी सकाळी हवामान खात्याने ५.८ अंश इतके हंगामातील सर्वांत नीचांकी तपमान नोंदविले होते. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी पारा ५.२ अंशांवर आला आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नाशिककर चांगलेच गारठले असून, आतापर्यंत या हंगामातील सर्वांत नीचांकी तपमानाची नोंद बुधवारी हवामान खात्याकडून करण्यात आली. अहमदनगरचे किमान तपमान ६.८, मालेगाव ७.०, पुणे ७.४, सातारा ९.५, सांगली ११.५, सोलापूर १०.६, अकोला ८.०, अमरावती ८.४, महाबळेश्वर ११.८ असे तपमान पुण्याच्या वेधशाळेने नोंदविले आहे.
वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, डॉक्टरांकडून पाणी गरम करून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. शहरामध्ये दोन दिवसांपासून दिवसभर हवेत गारवा क ायम असून, संध्याकाळी त्यात वाढ होत असल्याने नाशिककर सध्या दिवसभर उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीमध्ये नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत आहे.

निफाड @ 4
निफाड : तालुक्यातील कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाल्याने संपूर्ण निफाड तालुका गारठून गेला होता.
यावर्षी या तालुक्यात हे ४ अंश सेल्सिअस इतके सर्वात कमी तपमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी तालुक्यात पाऊस चांगला झालेला असून, कडाक्याच्या थंडीने मधून मधून या तालुक्याला गारठून टाकले आहे.