शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

थंडीची लागली चाहूल; हवेत वाढला गारवा..

By admin | Updated: October 27, 2014 00:13 IST

.कमाल तपमानात घट : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ हवामान; शेकोट्या पेटण्यास प्रारंभ

नाशिक : एरवी दिवाळीत आपल्या आगमनाची चाहूल देणाऱ्या गुलाबी थंडीने आता कोठे हळूहळू आपले अस्तित्व जाणवून देण्यास सुरुवात केली आहे. सध्या शहराचे किमान तपमान १८ ते १९ अंशांच्या दरम्यान स्थिर असले, तरी गेल्या चार दिवसांत कमाल तपमानात तब्बल आठ अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे हवेत गारवा जाणवू लागला आहे. दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून चांगली थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिवाळी आणि थंडीचे अतूट नाते आहे. दिवाळीतील पहाटेचे अभ्यंगस्नान गुलाबी थंडीच्या साक्षीनेच केले जाते. यंदाही दिवाळीपासून हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात झाली असली, तरी थंडी मात्र पडलेली नाही. काही दिवसांपासून शहराच्या कमाल तपमानात मोठी घट झाल्याने गारव्यात वाढ झाली आहे. सध्या शहराचे कमाल तपमान २५ ते ३०, तर किमान तपमान १८ ते १९ अंश सेल्सिअसवर स्थिर आहे. कमाल तपमान घटल्याने थंडीने आपल्या आगमनाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे रात्री व पहाटे लोक ऊबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, सध्या नैऋत्य अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्याचा थंडीच्या आगमनावरही परिणाम होत आहे; मात्र लवकरच हे वातावरण निवळून थंडी वाढण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)