वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:49 IST2018-04-13T00:49:10+5:302018-04-13T00:49:10+5:30
’नाशिक : शहरात गुरुवारी (दि.१२) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानकपणे सुटलेल्या सोसाट्याच्या वाºयासह पावसाच्या सरी कोसळल्याने नाशिककरांना उष्म्यापासून अल्पसा दिलासा मिळाला असला तरी धावपळ उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले.

दोन दिवसांपासून संध्याकाळी ढगाळ हवामान दाटून येत असल्याने तपमानात काहीशी घटही झाली. कमाल तपमान ३७ अंशांपर्यंत खाली घसरले. गुरुवारी कमाल तपमानाचा पारा ३६.५ अंशांवर आला. संध्याकाळी सहा वाजेपासून शहरातील जुने सीबीएस, शरणपूररोड, टिळकवाडी, तिडके कॉलनी, चांडक सर्कल, मुंबई नाका यांसह सिडको, पाथर्डी, अंबड, सातपूर, गंगापूर गावाच्या शिवारात जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयामुळे बहुतांश ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मुंबई नाक्यावर गुलमोहराच्या फांद्या कोसळल्याने दुचाकींचे नुकसान झाले. सिडको, अंबड परिसरातही झाडे, फांद्या कोलमडून पडल्या.