शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दुसºया दिवशीही ढगाळ वातावरण; तुरळक सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:59 PM

गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आणि तुरळक पाऊस असल्याने ऐन हिवाळ्यात नाशिकरांना काहीसा उकाडाही जाणवू लागला आहे.  पश्चिमेकडील राज्यांमध्ये झालेल्या बर्फवारी आणि पर्जन्यामुळे राज्यातील हवामानावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

ठळक मुद्देऐन हिवाळ्यात नाशिकरांना काहीसा उकाडाही जाणवू लागला नाशिकचे तपमान १३ अंश सेल्सिअसवरून थेट १८.८ अंशांवर शेतपिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान आणि तुरळक पाऊस असल्याने ऐन हिवाळ्यात नाशिकरांना काहीसा उकाडाही जाणवू लागला आहे.  पश्चिमेकडील राज्यांमध्ये झालेल्या बर्फवारी आणि पर्जन्यामुळे राज्यातील हवामानावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. येत्या दोन-तीन दिवसांत पावसाबरोबरच थंडीची लाटही येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातील अनेक भागांत पाऊस होऊ शकेल, असा अंदाज हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच वर्तविला होता. सोमवारी आणि मंगळवारीही झालेल्या पावसामुळे थंडीतही काहीसा उकाडा जाणवला. नाशिकचे तपमान १३ अंश सेल्सिअसवरून थेट १८.८ अंशांवर पोहचले आहे.  मागील आठवड्यात नाशिकचे तपमान राज्यात सर्वांत कमी दहा अंशांवर जाऊन पोहचले होते. त्यानंतर सातत्याने तपमानात वाढ होत गेली. ११, १२ आणि रविवारी १३ अंश सेल्सिअस इतक्या तपमानाची नोंद करण्यात आली होती. परंतु राज्यात पर्जन्याची शक्यता वर्तविल्यानंतरही तपमान मात्र १८.८ अंशांवर जाऊन पोहचले. येत्या दोन दिवसांत राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा परिणाम नाशिकमधील वातावरणावरदेखील होण्याची शक्यता असून, येत्या दोन-तीन दिवसांत ढगाळ वातावरणाबरोबरच तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे.  या पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतपिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. काढून ठेवलेल्या धान्याला बुरशी लागण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर पिकांवर रोग पडण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात आहे. भाजीपाला, फळभाज्या पिकांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक