शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

११० थकबाकीदारांचा पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: March 10, 2015 23:24 IST

११० थकबाकीदारांचा पाणीपुरवठा बंद

नाशिक : मार्चअखेर पाणीपट्टीच्या माध्यमातून सुमारे ७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महानगरपालिकेने बड्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून, सुमारे ५० हजारांपर्यंत थकबाकी असलेल्या ११० नळजोडणीधारकांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. शहरातील एक लाख ८३ हजारपैकी सुमारे ८२ हजार नळजोडणीधारकांनी थकबाकी न भरल्याने कारवाईची मोहीम अधिक व्यापक करण्याचा निर्णय पाणीपट्टी वसुली विभागाने घेतला आहे. महापालिकेने चालू आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या वसुलीतून ७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले आहे. फेब्रुवारीअखेर सुमारे ३३ कोटी रुपयांची वसुली झाली असून, ३१ मार्चपर्यंत सुमारे ३७ कोटी रुपये वसुलीचे आव्हान आहे. त्यादृष्टीने महापालिकेने वसुली मोहिमेला गती दिली आहे. शहरात एक लाख ७३ हजार ४०६ नळजोडणीधारक आहेत. त्यातील सुमारे ८२ हजार नळजोडणीधारक थकबाकीदार आहेत. पहिल्या टप्प्यात महापालिकेने २५ ते ५० हजारांपर्यंत थकबाकी असलेल्या नळजोडणीधारकांवर कारवाईचा बडगा उगारला असून, आतापर्यंत ४ हजार ११८ थकबाकीदारांना येत्या ४८ तासांच्या आत थकबाकीचा भरणा करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. सोमवारी (दि. ९) तीन हजार ५२० थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या, तर नाशिक पूर्व विभागातील १२, पश्चिम विभागातील १५, पंचवटीतील ६ आणि सातपूर विभागातील ३० थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्यात येऊन पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मंगळवारी (दि. १०) आणखी ५९८ थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. दोन दिवसांत ११० थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश आहे. दरम्यान, थकबाकीदारांविरुद्ध कारवाईची मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.