शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांना जोडलेल्या गटारी बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:20 IST

नदीपात्रात जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यांना जोडलेल्या गटारी बंद करण्यात येणार असून, त्यातील सांडपाणी मलवाहिकांना जोडून प्रक्रियेसाठी मलनिस्सारण केंद्रात पाठविले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी नदीपात्रातील कॉँक्रिटीकरण हटविले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

नाशिक : नदीपात्रात जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यांना जोडलेल्या गटारी बंद करण्यात येणार असून, त्यातील सांडपाणी मलवाहिकांना जोडून प्रक्रियेसाठी मलनिस्सारण केंद्रात पाठविले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी नदीपात्रातील कॉँक्रिटीकरण हटविले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.  गोदावरी नदी प्रदूषणासंबंधी उच्च न्यायालयात दाखल झालेली जनहित याचिका आणि त्यानुसार न्यायालय तसेच सल्लागार म्हणून नेमलेल्या ‘निरी’ या संस्थेने केलेल्या शिफारसी यावर अंमलबजावणीकरिता चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला निरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, मविप्रच्या वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्राजक्ता बस्ते, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, याचिकाकर्ते निशिकांत पगारे आणि राजेश पंडित, शहर अभियंता संजय घुगे, पर्यावरण विभाग प्रमुख वंजारी आदी उपस्थित होते. यावेळी गोदावरी नदीला येऊन मिळणारे नैसर्गिक नाले पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, नाल्यांना जोडल्या गेलेल्या गटारी बंद करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आणि सदर सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्याच्या सूचना केल्या. यावेळी निरीचे संचालक राकेशकुमार यांनी निरीने सुचविलेल्या शिफारशींची माहिती दिली. याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रमाण वाढविण्याची गरज असल्याबाबत चर्चा झाली.दरम्यान, गोदापात्रातील कॉँक्रिटीकरणासंदर्भात चर्चा होऊन स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा प्रकल्पात सदर कॉँक्रिटीकरण हटविण्याचा प्रस्ताव असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.गोदावरीला येऊन मिळणारे नालेगंगापूर गावापासून ते होळकर पुलापर्यंत मल्हारखाण, जोशीवाडा, चोपडा लॉन्स, देह मंदिर सोसायटी व चव्हाण कॉलनी, सुयोजित गार्डनमागे, आसारामबापू आश्रमातील भाग, चिखली नाला, सोमेश्वर नाला, बारदान फाट्याजवळील नाला, गंगापूर गावातील नाला तसेच पंचवटी भागात गांधारवाडी ते होळकर पुलापासून गांधारवाडी, कुसुमाग्रज उद्यानालगत, रामवाडी नाला, होळकर पुलापासून ते तपोवनपर्यंत सरस्वती नाला, नागझरी नाला, नासर्डी, वाघाडी, अरुणा, कपिला आदी नाले येऊन मिळतात. सदर नैसर्गिक नाले मोकळे करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका