ब्राह्मणगावी कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 19:05 IST2021-04-10T18:59:15+5:302021-04-10T19:05:27+5:30
ब्राह्मणगाव : येथे शासन आदेशाचे पालन करत शनिवार, रविवार दोन दिवस जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवून निर्बंध पाळण्यात आले. शिवाय अती उन्हामुळेही दुपारी रस्ते निर्मनुष्य होत असल्याने संपूर्ण गावात शांतता दिसून आली.

ब्राह्मणगाव प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेले कठडे, तर बंद ठेवण्यात आलेली दुकाने.
ब्राह्मणगाव : येथे शासन आदेशाचे पालन करत शनिवार, रविवार दोन दिवस जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवून निर्बंध पाळण्यात आले. शिवाय अती उन्हामुळेही दुपारी रस्ते निर्मनुष्य होत असल्याने संपूर्ण गावात शांतता दिसून आली.
येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज कोविड प्रतिबंधक लसीकरण व्यवस्थित चालू असून संशयित रुग्णाची रॅपिड टेस्ट,आरटीपीसीआर, टेस्टिंग ही करण्यात येत आहे. ग्रामस्थांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
मात्र शनिवारी लस पुरवठा, टेस्टिंग किट संपल्याने लसीकरण व टेस्टिंग बंद ठेवण्यात आले होते. यामुळे अनेक लाभार्थी परत गेले. लस लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.
शनिवार, रविवार दोन दिवस किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आली असून सोमवारी भाजीपाला विक्रीही बंद करण्यात आल्याची माहिती सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापू खरे यांनी दिली.
गावात प्रतिबंधक फवारणी दररोज करण्यात येत असून आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. ग्रामस्थांनी मास्क वापरणे, विनाकारण फिरू नये असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कांबळे यांनी केले आहे.