शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

आयुक्तांनी घेतला मनपा शिक्षकांचा वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:10 AM

नाशिक : महापालिका शाळेमधील शिक्षक अध्ययनच विसरले असल्याने शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चांगले विद्यार्थी घडविण्यापेक्षा चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षकाने शिक्षक म्हणूनच आपली छाप सोडणे अपेक्षित आहे. मात्र शिकविण्याची साचेबद्ध पद्धतीमुळे सर्वांगीण शिक्षण हरवून बसल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दुपारच्या ...

ठळक मुद्देगुणवत्तेचे दिले धडे : गुरूजीच अभ्यास विसरल्याचा टोला

नाशिक : महापालिका शाळेमधील शिक्षक अध्ययनच विसरले असल्याने शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चांगले विद्यार्थी घडविण्यापेक्षा चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षकाने शिक्षक म्हणूनच आपली छाप सोडणे अपेक्षित आहे. मात्र शिकविण्याची साचेबद्ध पद्धतीमुळे सर्वांगीण शिक्षण हरवून बसल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दुपारच्या सत्रात कालिदास कलामंदिरात महापालिका शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना गुणवत्ता आणि कौशल्यपूर्ण शिक्षणाचे धडे दिले. शिक्षणाच्या बाजारीकरणाला प्राथमिक शिक्षणातील उदासीनता आणि शिक्षकांची मानसिकता कारणीभूत असून, ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे. शिक्षक म्हणजे काय आणि आपली भूमिका कशी असली पाहिजे हे अगोदर शिकण्याची गरज आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे नियोजन करून विद्यार्थ्यांना शिकविले पाहिजे. परंपरागत चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे न जाता नावीन्यपूर्ण अध्ययन आणि अध्यापन कौशल्याचा वापर शिक्षकांनी केला तरच महापालिका शाळांमध्ये विद्यार्र्थी टिकतील. यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्यात समन्वय निर्माण होण्याची गरज आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपल्याला सगळेच समजते हा गैरसमज काढून शिकण्याची प्रक्रिया स्वीकारली पाहिजे. केवळ पाठ्यपुस्तकांतून शैक्षणिक वर्ष पूर्ण होते; परंतु मुलांमध्ये शिकण्याची गुणवत्ता वाढविणे शिक्षकांच्या हाती आहे. स्वच्छतेचे धडे, वाहतूक नियमाची शिस्त, शाळेत-रस्त्यावर थुंकू नये, या नागरी जाणिवा विद्यार्थ्यांना शिक्षणातून शिकविता आल्या पाहिजेत. त्यासाठी तेवढी गुणवत्ता शिक्षकांमध्ये वाढणे अपेक्षित आहे. तुमची छाप विद्यार्थ्यांवर पडली पाहिजे. शिक्षकाच्या भूमिकेत एकरूप होऊन शिकविले तर तुम्ही लक्ष वेधून घेऊ शकता. हे केले नाही तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार नाही, कदाचित त्याचे गुण वाढतील, पण माणूस म्हणून तो प्रगल्भ होणार नाही, असे मुंढे म्हणाले.लर्निंग अ‍ॅबिलिटी वाढवाकेवळ शिकविणे एवढीच शिक्षकाची भूमिका मर्यादित नाही. विद्यार्थ्यांमधील लर्निंग अ‍ॅबिलिटी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ करण्याची भूमिका शिक्षकांनी बजविणे अपेक्षित आहे. इंग्रजी शाळांमध्ये मुलांसाठी जे उपक्रम राबविले जातात ते मनपा शाळेतही शक्य आहे. यासाठी शिक्षकांची भूमिका शिकविण्याची असली पाहिजे. मग आरोग्य असेल, एकाग्रता वाढविणे असेल, आरोग्याची काळजी असेल, संपर्ककला असेल या माध्यमातून मुलांमध्ये शिकण्याची गुणवत्ता वाढविणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEducationशिक्षण