शहराला जोरदार सरींनी झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:16 IST2020-08-14T00:16:26+5:302020-08-14T00:16:58+5:30
शहर व परिसराला गुरुवारी (दि.१३) दिवसभर संततधार पावसाने झोडपले. दुपारी दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत शहरात जोरदार सरींचा वर्षाव झाल्याने नागारिकांनी समाधान व्यक्त केले.

शहरात गुरुवारी (दि.१३) झालेल्या पावसामुळे बाजारपेठेत साचलेले पाणी.
नाशिक : शहर व परिसराला गुरुवारी (दि.१३) दिवसभर संततधार पावसाने झोडपले. दुपारी दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत शहरात जोरदार सरींचा वर्षाव झाल्याने नागारिकांनी समाधान व्यक्त केले. दुपारी तीन ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरा १५ मि.मी इतका पाऊस मोजला गेला. दुपारपासून शहरासह उपनगरांमध्येही पावसाच्या जोरदार सरींचे आगमन झाले. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९.२ मि.मी इतका पाऊस शहरात मोजला गेला होता. गुरुवारी मात्र या तुलनेत दुप्पट पाऊस
झाला.
या बारा दिवसांत पहिल्यांदाच शहरात आठ तासांत १५ मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकली दुपारी तीन वाजेपासून उपनगरांमध्ये पावसाने जोर धरला. पुढील दोन तास विहितगाव, नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, अशोकामार्ग, द्वारका, वडाळागाव, इंदिरानगर या भागात जोरदार पाऊस झाला. सहा वाजेनंतर संध्याकाळी पावसाचा जोर ओसरला; मात्र ढग कायम होते.