शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

नाशिक शहरासाठी यंदा हवे पाचशे दलघफू अधिक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:47 IST

नाशिक : शहराची वाढती गरज लक्षात घेऊन आगामी आठ महिन्यांसाठी पाच हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण मिळावे यासाठी नाशिक महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. तथापि, यंदा जलसंपदा विभागाचे नवीन निकष आणि कश्यपीतील अपुरा साठा आणि दारणातून पाणी उचलताना येणाऱ्या मर्यादा या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेला किती आरक्षण मिळते आणि ते कितपत पुरवले जाते याकडे आता लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचा प्रस्ताव : गंगापूर धरण समूहात पुरेसा साठा नसल्याने साशंकता

नाशिक : शहराची वाढती गरज लक्षात घेऊन आगामी आठ महिन्यांसाठी पाच हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण मिळावे यासाठी नाशिक महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. तथापि, यंदा जलसंपदा विभागाचे नवीन निकष आणि कश्यपीतील अपुरा साठा आणि दारणातून पाणी उचलताना येणाऱ्या मर्यादा या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेला किती आरक्षण मिळते आणि ते कितपत पुरवले जाते याकडे आता लक्ष लागून आहे.महापालिकेला गंगापूर धरणाबरोबरच दारणा आणि मुकणे धरणातून पाणी पुरवले जाते. मात्र, दरवर्षी पाण्याचा वापर वाढत आहे. त्यामुळे महापालिका आणि जलसंपदा विभागात काहीसे शीतयुद्ध रंगत असते. दरवर्षी पाणी आरक्षणाच्या बैठकीत नाशिक महपाालिकेच्या पाणीवापरावर जोरदार चर्चा होते आणि पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जाते. मात्र, मुळातच नाशिक ही पर्यटन नगरी होत असल्याने चाळीस ते पन्नास हजार तरंगती लोकसंख्या असल्याने पाण्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याचे महापालिकेचे म्हणणे असते. गेल्यावर्षी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले होते. मात्र, पाच हजार २१४ दशलक्षघन फूट वापर झाला होता. यंदा नाशिक महापालिकेने १५ आॅक्टोबर ते ३१ जुलै २०२१ या कालावधीसाठी ५ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढी आरक्षणाची मागणी केली आहे. गेल्यावर्षी महापालिकेला गंगापूर धरणातून ३६०० दशलक्ष घनफूट आरक्षण मिळाले होते. प्रत्यक्षात पाण्याचा वापर ३ हजार ६४९ इतका झाला. दारणा धरणातून चारशे दशलक्ष घनफूट आरक्षण मिळाले होते त्यात मल जल मिसळत असल्याने पावसाळ्याचे दोन महिने या पाण्याचा वापर करता आला नाही. त्यामुळे ३१९ दशलक्ष घनफूट इतकाच पाण्याचा वापर झाला तर मुकणे धरणातून एक हजार दशलक्षघन फूट आरक्षण मंजूर होते. प्रत्यक्षात १२४६ इतका वापर झाला आहे. त्यामुळे महापालिकेने यंदा सहाशे दशलक्ष घनफूट ज्यादा पाणी आरक्षण मागितले आहे.असे मागितले आरक्षण (दशलक्ष घनफूटमध्ये)एकूण- ५६००गंगापूर धरण समूह- ३८००दारणा- ४००मुकणे- १३००----------------गतवर्षीचा वापरएकूण मंजूर आरक्षण- ५०००गंगापूर- ३६००दारणा- ४००मुकणे- १०००----------------गंगापूर धरणाएवढे हवे आरक्षणनाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणाची क्षमता ७२०० दक्षलक्ष घनफूट इतकी होती. मात्र गाळ साचल्याने या धरणाची क्षमता ५६०० दशलक्ष घनफूट इतकी आहे. महापालिकेने यंदा ५६०० दशलक्ष घनफूट इतके पाणी आरक्षण मागितले असून, ते गंगापूर धरणाच्या साठवण क्षमतेइतके आहे.

 

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी