शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मतमोजणीबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 01:25 IST

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट लावून मतदान झालेली पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने सामान्य नागरिकांनादेखील यंदाच्या निकालाबरोबरच मतमोजणी कशाप्रकारे होते, त्याबाबत प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल आहे.

नाशिक : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट लावून मतदान झालेली पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने सामान्य नागरिकांनादेखील यंदाच्या निकालाबरोबरच मतमोजणी कशाप्रकारे होते, त्याबाबत प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल आहे. प्रारंभी होणाऱ्या पोस्टल मतमोजणीपासून विजेत्या उमेदवाराला प्रमाणपत्र प्रदान करण्याच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती नागरिकांचे कुतूहल शमविण्यास उपयुक्त ठरू शकणार आहे.विधानसभेच्या मतमोजणी प्रक्रि येमध्ये सकाळी ६ पासूनच सर्व निवडणूक अधिकारी, सहकारी, कर्मचारी, तसेच उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रांवर दाखल होतात. सर्वप्रथम रिटर्निंग अधिकारी आणि त्यांचे सहकारी सगळ्यांसमोर मतांची गोपनीयता राखण्याची शपथ घेतात. त्यानंतर रिटर्निंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सगळ्या ईव्हीएमची तपासणी केली जाते. यावेळी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आपल्या काउंटिंग एजंटसोबत मतमोजणी केंद्रांवर उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. हे एजंट मतमोजणी पाहू शकतात. मतमोजणीला प्रारंभ केल्यानंतर सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी केली जाते. त्यानंतरच ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होते. मतदान केंद्रांवर एका विशिष्ट क्र माने ठेवलेल्या ईव्हीएम आॅन करून त्यांच्यात नोंदल्या गेल्या मतांची मोजणी होते. त्यानंतर वेगवेगळ्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची मोजदाद होते. त्यानंतर सगळ्या मतदान केंद्रांवरच्या ईव्हीएमवरील आकड्यांची बेरीज केली जाते. त्यातून उमेदवारनिहाय मतांची बेरीज समजून एकूण मतसंख्या समजते.व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणीनिवडणूक आयोगानुसारची मतमोजणी संपल्यानंतर त्यांची टोटल व्हीव्हीपॅटच्या पावत्यांशी पडताळून पाहिली जाते. या कामासाठी प्रत्येक काउंटिंग हॉलमध्ये वेगळा व्हीव्हीपॅट बूथ राहणार आहे. कोणत्याही प्रकारचा वाद किंवा तांत्रिक अडचणींमुळे मतमोजणी थांबली तर याबद्दल ताबडतोब निवडणूक आयोगाला कळवणे, ही रिटर्निंग अधिकाºयाची जबाबदारी आहे. ही सूचना मिळताच निवडणूक आयोग त्या ठिकाणी मतमोजणी चालू ठेवणे, मतमोजणी रद्द करणे किंवा पुनर्मतदान करण्याचा आदेश देऊ शकते.विजेत्या उमेदवाराला प्रमाणपत्रजर कोणत्याही त्रुटीशिवाय मतमोजणी पूर्ण झाली आणि निवडणूक आयोगाने दुसरा कोणता आदेश दिला नाही तर रिटर्निंग अधिकारी निकाल घोषित करतात. तसेच त्यानंतर संबंधित विजेत्या उमेदवाराला त्याबाबतचे प्रमाणपत्रदेखील काही वेळात निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या हस्ते प्रदान केले जाते. निवडणूक आयोगाने यंदा सुविधा नावाचे अ‍ॅपही लाँच केले आहे. त्या अ‍ॅपवर मतदान केंद्रांचे अधिकृत निकाल नागरिकांना पाहता येऊ शकतात.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Result Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकNashikनाशिक