शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नागरिकांची गर्दी

By admin | Updated: April 4, 2017 01:56 IST

नाशिक : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी कालपर्यंत महापालिकांच्या विभागीय कार्यालयाबाहेर अर्जासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांनी सोमवारी सकाळी तलाठी कार्यालयाला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वेढा दिला.

 नाशिक : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी कालपर्यंत महापालिकांच्या विभागीय कार्यालयाबाहेर अर्जासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांनी सोमवारी सकाळी तलाठी कार्यालयाला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वेढा दिला. त्यामुळे तलाठी कार्यालयाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होऊन अखेर सेतू कार्यालयामार्फत अर्ज सादर करण्याचा सल्ला देऊन तलाठ्यांनी आपली मान सोडवून घेतली. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या घरकुलासाठी उत्पन्नाची अट घालण्यात आली असून, अत्यल्प उत्पन्न गटालाच यात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अर्जात नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे वार्षिक उत्पन्नाचा दाखला अर्जासोबत जोडावा लागणार असल्यामुळे सोमवारी सकाळी शेकडो नागरिकांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील तलाठी कार्यालयाला धडक दिली. अचानक शेकडोच्या संख्येने आलेल्या नागरिकांनी तलाठी कार्यालयातून वार्षिक उत्पन्नाचा दाखला अथवा शिफारस मिळण्याची मागणी केली. उपस्थित तलाठ्यांनी त्यांना अशा प्रकारे दाखल देता येत नसल्याचे सांगूनही नागरिकांचे समाधान होत नसल्याने काही काळ प्रचंड गोंधळ उडाला. पंतप्रधान आवास योजनेच्या अर्जातच वार्षिक उत्पन्न दाखला जोडण्यासाठी व त्यासाठी तलाठी कार्यालयातून दाखला आणण्याचा उल्लेख असल्याचा दावा अर्जदारांकडून केला गेला. वार्षिक उत्पन्न स्वयंघोषणेवर जाहीर करता येत असल्याची बाबही तलाठी कार्यालयाकडून नमूद करण्यात आली, परंतु नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर सर्वांना सेतू कार्यालयात अर्ज सादर करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर गर्दी निवळली.उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर महिलांनी असा ठिय्या मांडला होता.