सिडकोत बँकेचे लॉकर तोडले; कामठवाड्यात एक लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 07:46 PM2020-02-14T19:46:16+5:302020-02-14T19:49:15+5:30

नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला असून, निर्मनुष्य घरांसोबत छोट्या मोठ्या बँका आणि पतंसस्थांवरही चोरट्यांनी त्यांची नजर वळविली आहे. त्यातूनच सिडकोत बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी दोन चोरीच्या घटनांमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले आहे. 

Cidco's bank locker broke; One lakh burglary in Kamwada | सिडकोत बँकेचे लॉकर तोडले; कामठवाड्यात एक लाखाची घरफोडी

सिडकोत बँकेचे लॉकर तोडले; कामठवाड्यात एक लाखाची घरफोडी

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिकमध्ये चोऱ्यांचे सत्र सिडकोत बँकेेचे लॉकर तोडलेकामठवाडेत घरफोडीत एक लाख लंपास

नाशिक : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला असून, निर्मनुष्य घरांसोबत छोट्या मोठ्या बँका आणि पतंसस्थांवरही चोरट्यांनी त्यांची नजर वळविली आहे. त्यातूनच सिडकोत बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी दोन चोरीच्या घटनांमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले असून, चोरट्यांनी कामठवाडे येथे घरफोडी, तर सिडकोत चक्क बँकेची तिजोरी फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. 
घरात कोणी नसल्याचा फायदा गेत अज्ञात चोरट्याने लॉकरमधून एक लाख १० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना मुरारीनगर, कामटवाडा, अंबड लिंक रोड येथे घडली. याप्रकरणी योगेश्वर वाल्मीक शेळके (२६) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेळके यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून एक लाख १० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ते घरी आले असता घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात फि र्याद दिली, तर दुसरी घटना विठ्ठल मंगल कार्यालयाजवळील साईप्रसाद अपार्टमेंटमध्ये इकविटास बँकेत घडली. अज्ञात चोरट्याने बँकेच्या बंद दरवाजाचा कोयंडा तोडून बँकेची तिजोरी फोडत ४६ हजार ३६५ रुपये लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अजय अशोक जाधव यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

Web Title: Cidco's bank locker broke; One lakh burglary in Kamwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.