सिडकोत दुचाकी जळीतकांड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2016 00:58 IST2016-05-15T00:44:31+5:302016-05-15T00:58:21+5:30

आठवड्यात दुसरी घटना : संतप्त नागरिकांचे आंदोलन; एका संशयितास अटक

Cidcoet burns two wheelers | सिडकोत दुचाकी जळीतकांड सुरूच

सिडकोत दुचाकी जळीतकांड सुरूच

 सिडको : गेल्या दोन दिवसांपूर्वीच अंबड येथील महालक्ष्मीनगर भागात अज्ञात समाजकंटकांनी दुचाकी जाळल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा याच परिसरातील नीलांजन नील या सोसायटीत घडली. समाजकंटकांनी पुन्हा सहा दुचाकी जाळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारांना त्वरित अटक करावी, यासंदर्भात संतप्त स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही वेळातच एका संशयितास ताब्यात घेतल्याने जाळपोळीचे गूढ उकलण्याची शक्यता अंबड पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अंबड महालक्ष्मीनगर भागात गुन्हेगारी, चोऱ्या, घरफोड्यांबरोबरच आता गाड्या जाळपोळीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या गुुरुवारी (दि.१२)अज्ञात समाजकंटकांनी महालक्ष्मीनगर भागातील श्री सोसायटीतील पार्किंगच्या जागेत असलेल्या सहा दुचाकी जाळल्या. ही घटना होऊन दोन दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा याच भागात समाजमंदिराच्या लगतच असलेल्या नीलांजन नील या सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या सहा दुचाकी मध्यरात्री जाळल्या.

Web Title: Cidcoet burns two wheelers