सिडकोत घरफोडीत ४८ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:20 IST2018-09-23T00:19:40+5:302018-09-23T00:20:18+5:30
सिडको परिसरातील राजरत्ननगर येथील रहिवासी नंदलाल शेषराव इप्पर (३१) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. लोखंडी शोकेसमधील सुमारे ४८ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

सिडकोत घरफोडीत ४८ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास
नाशिक : सिडको परिसरातील राजरत्ननगर येथील रहिवासी नंदलाल शेषराव इप्पर (३१) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. लोखंडी शोकेसमधील सुमारे ४८ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. राजरत्ननगर येथील इप्पर यांच्या बंद घरात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील लोखंडी शोकेसची झाडाझडती घेत त्यामधील १६ ग्रॅमचा सोन्याचा ३२ हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, दहा हजारांचे कानातील पाच ग्रॅमचे कर्णफुले, सहा हजार रुपयांची तीन ग्रॅमची अंगठीसह स्वयंपाकाचा एलपीजी सिलिंडर चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.