सिडकोला पेट्रोल टाकुन दुचाकी पेटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 13:53 IST2019-12-02T13:52:41+5:302019-12-02T13:53:39+5:30

सिडको : परिसरातील राजरत्न नगर येथे अज्ञात समाज कंटकांनी मोटार सायकल जाळल्याचा प्रकार घडला. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले ...

Cidco was hit by a bike | सिडकोला पेट्रोल टाकुन दुचाकी पेटविली

सिडकोला पेट्रोल टाकुन दुचाकी पेटविली

ठळक मुद्देअज्ञात समाजकंटकांविरूध्द गुन्हा दाखल

सिडको : परिसरातील राजरत्न नगर येथे अज्ञात समाज कंटकांनी मोटार सायकल जाळल्याचा प्रकार घडला. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, राजरत्ननगर येथील रहिवासी किरण सुरेश महाले यांनी त्यांची दुचाकी (एम.एच १५ ईडी ३१९८) घरासमोर नेहमीप्रमाणे उभी केली. शनिवारी (दि.३०) मध्यरात्री बारा ते दोन वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या दुचाकीवर पेट्रोल टाकुन आग लावली. यामुळे दुचाकीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन, महाले यांच्या तक्र ारी वरून अंबड पोलीसांनी अज्ञात समाजकंटकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार सुखदेव धरम करीत आहे .

Web Title: Cidco was hit by a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.