शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

सिडकोतील कारवाई तूर्त स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:53 AM

नाशिक : सिडकोत ड्रेनेज आणि पाणीपुरवठा पाइपलाइनवर उभे राहिलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू केलेल्या रेखांकनाला (मार्किंग) रहिवाशांकडून वाढता विरोध होऊ लागल्यानंतर महापालिकेने अखेर रेखांकनाचे काम तूर्त थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देरेखांकनाचे काम थांबविले : कंपाउंडिंगचे प्रस्तावाचे आवाहन

नाशिक : सिडकोत ड्रेनेज आणि पाणीपुरवठा पाइपलाइनवर उभे राहिलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू केलेल्या रेखांकनाला (मार्किंग) रहिवाशांकडून वाढता विरोध होऊ लागल्यानंतर महापालिकेने अखेर रेखांकनाचे काम तूर्त थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोतील कारवाईला स्थगिती देतानाच रहिवाशांना शासनाच्या धोरणांतर्गत अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यामुळे रहिवाशांना आठवडाभरात नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करावे लागणार आहेत.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सिडकोतील ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याच्या लाइनवर उभी राहिलेली अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आदेश दिल्यानंंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयामार्फत अनधिकृत बांधकामांवर रेखांकनाचे काम सुरू आहे. मात्र, या रेखांकनाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. सिडको विभागीय अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येऊन कर्मचाºयांना पिटाळूनही लावण्यात आले होते. बुधवारी (दि. २३) नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे तसेच आमदार अपूर्व हिरे यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. आमदार सीमा हिरे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासित केले होते. याचवेळी सिडको बचाव संघर्ष समिती स्थापन करून शुक्रवारी (दि. २५) राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. काही नगरसेवकांसह नागरिकांच्या शिष्टमंडळांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफीयत मांडली. परंतु, लाल फुली हीच नोटीस समजा, असे सांगत आयुक्तांनी कारवाई होणारच असे स्पष्ट केले होते. बुधवारी या घटना-घडामोडी वेगाने घडल्यानंतर गुरुवारी मात्र महापालिका प्रशासनाने वाढता जनक्षोभ लक्षात घेता नरमाईची भूमिका घेतली आणि रेखांकनाचे काम तूर्त थांबविण्याचा निर्णय घेतला. नागरिकांनी आपले अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी शासनाच्या धोरणांतर्गत कंपाउंडिंगचे प्रस्ताव नगररचनाकडे सादर करावेत, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले. गुरुवारी (दि. २४) सकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी सिडकोच्या विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांना रेखांकनाचे काम तूर्त थांबविण्याचे आदेशित केले. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात कुठेही रेखांकन झाले नाही.केवळ रस्त्यावरील बांधकाम हटविणारमहापालिकेच्या प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेकडून रेखांकनाचे काम हे केवळ ड्रेनेज आणि पाणीपुरवठा लाइनवर उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांपुरता मर्यादित आहे. महापालिकेकडे रस्ते हस्तांतरित झाले असल्याने त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी मनपाची आहे. त्यासाठीच तेथील बांधकामे हटविली जाणार आहेत. रस्त्याच्या आतील मूळ इमारत अथवा तेथील वाढीव बांधकाम काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याठिकाणी कारवाई करण्यासाठी सिडकोचे ना हरकत पत्र लागेल, असेही या सूत्राने स्पष्ट केले आहे.कंपाउंडिंगबाबत प्रश्नचिन्हमहापालिकेकडून सिडकोतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी कंपाउंडिंग धोरणांतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. परंतु सिडको परिसरातील घरकुलांचे अनधिकृत बांधकामे कंपाउंडिंग धोरणानुसार नियमित करता येतील काय, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोत जागेवर मालकीहक्क सिडकोचा असून, रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित झालेले आहेत. सिडकोत वसाहत तयार झाली त्याचवेळी एक एफएसआय देण्यात आलेला आहे. त्यामुळे तेथे आणखी एफएसआय कितपत मिळेल याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. याचबरोबर, सिडकोत मोरवाडी, उंटवाडी, कामटवाडे या गावठाण परिसरापासून ५०० मीटरवर वसलेल्या वसाहतींना एकास दोन एफएसआय मिळू शकतो. त्यामुळे शासनाच्या धोरणांतर्गत काही बांधकामे नियमित होऊ शकतात, असाही एक मतप्रवाह आहे.