घशात चॉकलेट अडकल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 02:58 IST2022-04-02T02:54:39+5:302022-04-02T02:58:11+5:30

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे गुरुवार, दि. ३१ मार्च रोजी एका १४ महिन्यांच्या चिमुरड्याचा चॉकलेट घशात अडकून दुर्दैवी मृत्यू झाला.

Chimukalya's unfortunate death due to chocolate stuck in his throat | घशात चॉकलेट अडकल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

घशात चॉकलेट अडकल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत शहरातील घटना

पिंपळगाव बसवंत : चॉकलेट हे लहान मुलांचा जीव की प्राण असतो. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या लेकरांना चॉकलेट देऊन लाड पुरवत असतात. मात्र, पालकांनी दिलेलं चॉकलेटच एका चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना  निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे गुरुवार, दि. ३१ मार्च रोजी घडली.  एका १४ महिन्यांच्या चिमुरड्याचा चॉकलेट घशात अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
लक्ष अजय चव्हाण असं मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे  नाव आहे. त्याला घरच्यांनी  एक चॉकलेट खायला दिलं होतं.  चॉकलेट खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात लक्ष अत्यवस्थ होऊ लागला.  घशात चॉकलेट अडकल्यानं त्याचा श्वास गुदमरू लागला. मुलगा लक्षची ही अवस्था पाहून कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत चिमुकल्या लक्षचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. 

Web Title: Chimukalya's unfortunate death due to chocolate stuck in his throat