चिमुकल्यांनी भरविला बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:57 IST2020-09-21T22:40:45+5:302020-09-22T00:57:31+5:30
वरखेडा : दिंडोरी एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील वरखेडा येथील अंगणवाडीमध्ये आरोग्य पोषण आहार सप्ताह राबविण्यात येत आहे. आरोग्य पोषण आहार सप्ताहाचे उद्घाटन मुख्य सेविका बी. जी. गवळी, ग्रामविकास अधिकारी व्ही. साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

वरखेडा येथे एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत पोषण आहार सप्ताहात चिमुकल्यांनी भरविलेला बाजार.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरखेडा : दिंडोरी एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील वरखेडा येथील अंगणवाडीमध्ये आरोग्य पोषण आहार सप्ताह राबविण्यात येत आहे. आरोग्य पोषण आहार सप्ताहाचे उद्घाटन मुख्य सेविका बी. जी. गवळी, ग्रामविकास अधिकारी व्ही. साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सप्ताहांतर्गत लहान बालकांना विविध वेशभूषा करून आठवडे बाजार भरविण्यात आला होता. लहान मुलांना आहार कसा द्यावा, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, गरोदर महिलांनी गरोदर काळामध्ये घ्यावयाची काळजी, याशिवाय किशोरवयीन मुलींना स्वत:ची स्वच्छतेचे धडे देण्यात आले. कडधान्य, पालेभाज्या याविषयी महत्त्व पटवून देण्यात आले. कोरोना प्रादुर्भावबाबतदेखील माहिती देत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी अंगणवाडी सेविका कुसुम अस्वले, चंद्रकला गांगुर्डे, आशा वडजे, स्वाती थोरात,
आरोग्यसेविका ए. आर. आणिक आणि जी. बी. मोरे अशासेविका सुवर्णा देशमुख, सविता भागवत, सुनीता गांगुर्डे, रेखा लिलके, भाऊराव उखाडे, सुनील शिंदे उपस्थित
होत्या.सप्ताहांतर्गत बेटी बचाव, बेटी पढाव, घर घर मे पोषण, देश रोशनच्या घोषणा देत जनजागृती फेरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून काढण्यात आली होती.