ढोबळी मिरची ठरत आहे फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:47 IST2020-07-20T22:25:36+5:302020-07-21T01:47:37+5:30

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नगदी पीक म्हणून ढोबळी मिरची लागवडीस प्राधान्य देतात. विशेषत: दारणा नदीच्या काठावरील चाडेगावच्या शिवारात ढोबळी मिरची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आढळते. शेडनेटमधील ढोबळी मिरचीला प्राधान्य देण्यात येते. साधारण ५० टक्के सूर्यप्रकाश अडविणारे पक्के शेडनेट यासाठी तयार केले जाते.

Chili is beneficial | ढोबळी मिरची ठरत आहे फायदेशीर

ढोबळी मिरची ठरत आहे फायदेशीर

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नगदी पीक म्हणून ढोबळी मिरची लागवडीस प्राधान्य देतात. विशेषत: दारणा नदीच्या काठावरील चाडेगावच्या शिवारात ढोबळी मिरची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आढळते. शेडनेटमधील ढोबळी मिरचीला प्राधान्य देण्यात येते. साधारण ५० टक्के सूर्यप्रकाश अडविणारे पक्के शेडनेट यासाठी तयार केले जाते.
ढोबळी मिरची लागवडीपूर्वी रोपे तयार केली जातात. ३ मीटर बाय १ मीटर बाय १५ सेंटीमीटर आकाराचे गादी वाफे तयार करून त्यावर उत्तम कुजलेले शेणखत अथवा गांडूळखत योग्यप्रकारे पसरविले जाते. एप्रिलपासून जुलै, आॅगस्टपर्यंत लागवड केली जाते. साधारणपणे ४५ ते ५५ दिवसांची व किमान चार ते सहा पाने असलेली रोपे पुनर्लागवडीसाठी वापरली जातात. लागवडीसाठी अडीच फूट उंचीचे व पाच फूट अंतर असलेले वाफे योग्यप्रकारे माती व खतांचे मिश्रण तयार करतात. दोन फूट उंचीच्या वाफ्यावर मल्ंिचग पेपर, त्याखाली इनलाइन ठिबकच्या दोन नळ्या जोडतात.
----------------
शेडनेटमधील लागवडीसासाठी खर्च जास्त येत असला तरी उत्पादनही चांगले निघते. लागवडीनंतर शेंडा मारणे, बांधणी करणे, औषधांचे फवारे मारणे यांसह खतांची मात्रा वेळच्या वेळी दिली, तर ४५ ते ६० दिवसांत उत्पादन काढण्यास सुरु वात होते. एकदा लागवड केली की सुमारे सहा महिन्यांपासून वर्षभरापर्यंत उत्पादन सुरू राहते. नाशिक बाजार समितीत विक्र ी केली जाते. एका क्रे टला साधारण ७०० ते ८०० रु पये भाव मिळतो. त्यामुळे खर्च वजा जाता बऱ्यापैकी पैसा शेतकऱ्यांच्या इतर शेतीकामांसाठी उपयोगी पडतो.
-विलास चकोर, शेतकरी, चाडेगाव

Web Title: Chili is beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक