लिफ्टच्या खड्ड्यात पडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:01 IST2018-12-17T01:00:46+5:302018-12-17T01:01:03+5:30

वासननगर परिसरात बांधकामाच्या ठिकाणी लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१६) घडली़

The child's unfortunate death by lying in the pit | लिफ्टच्या खड्ड्यात पडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

लिफ्टच्या खड्ड्यात पडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

इंदिरानगर : वासननगर परिसरात बांधकामाच्या ठिकाणी लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१६) घडली़ श्रेयस चव्हाण (५, रा़ दत्तचौक, सिडको) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोच्या दत्त चौकातील चव्हाण नामक महिला आपल्या पाच वर्षीय मुलगा श्रेयस यास घेऊन कामावर गेल्या होत्या़ बराच वेळापासून श्रेयस दिसत नसल्याने चव्हाण यांनी श्रेयसचा शोध घेतला असता खड्ड्यातील पाण्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला़
श्रेयस यास तातडीने पाण्याबाहेर काढून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, या घटनेची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

Web Title: The child's unfortunate death by lying in the pit