शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

दोन अधिकाऱ्यांची मुलेही बडतर्फ

By admin | Updated: March 4, 2017 01:23 IST

नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालयातभरतीत नियमांचे उल्लंघन करत चुकीच्या पद्धतीने झालेल्या भरतीत बडतर्फ करण्यात आलेल्या सहा जणांपैकी दोन जण मुद्रणालयातील अधिकाऱ्यांचे मुले आहे.

नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालयात वर्षभरापूर्वी झालेल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या भरतीत नियमांचे उल्लंघन करत चुकीच्या पद्धतीने झालेल्या भरतीत बडतर्फ करण्यात आलेल्या सहा जणांपैकी दोन जण मुद्रणालयातील अधिकाऱ्यांचे मुले असल्याचे समोर आले आहे.भारत प्रतिभूती मुद्रणालयात वर्षभरापूर्वी छपाई (प्रिंटिंग) विभागाकरिता कनिष्ठ अधिकारी (सुपरवायझर) या पदाकरिता मुंबईत भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. प्रिंटिंग विभागाकरिता भरती करावयाची असताना मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल अशा जागांसाठी भरतीप्रक्रिया दाखविण्यात आली. प्रिंटिंग डिप्लोमा शिक्षण आवश्यक असताना इतर जागा दाखवून त्या शैक्षणिक पदविकाधारक उमेदवारांना भरती करून घेतले होते. याबाबत भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांनी मुद्रणालय महामंडळाच्या चीफ व्हिजिलन्स विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांची दखल घेऊन या भरतीप्रक्रियेत चौकशी करण्यात आल्यानंतर चुकीच्या पद्धतीने भरतीप्रक्रिया राबविण्यात आल्याचे उघडकीस आले.या भरती घोटाळ्याची गंभीर दखल घेऊन मुद्रणालय महामंडळाने चार दिवसांपूर्वी कुणाल भिकाजी गोलप (मुरबाड, कल्याण), अभिषेक इंद्रजित पाल (औरंगाबाद), आशिष सुरेश शेंडे (चंद्रपूर), मृणाल अनिल जंगले (नाशिकरोड), कैलास खेलूकर (चाटोरी, निफाड), नवल किशोर पाल (जेलरोड नाशिकरोड) या सहा कनिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे मृणाल जंगले यांचे वडील अनिल जंगले हे भारत प्रतिभूती मुद्रणालयात कंट्रोल विभाग प्रमुख व महामंडळाच्या ९ युनिटच्या इस्टेट विभागांचे मुख्य अधिकारी आहेत. तर नवल पाल यांचे वडील किशोर पाल हे चलार्थपत्र मुद्रणालयात अधिकारी असल्याचे समोर आले आहे. यामुळे मुद्रणालय व महामंडळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)