लष्कराच्या वाहनाने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:38 IST2020-02-28T23:37:32+5:302020-02-28T23:38:36+5:30
वडनेर दुमाला पाळदे मळा येथील आठ वर्षाचा मुलगा गगनदिप सुशीलकुमार यादव हा गुरुवारी सायंकाळी सायकलवरून घराजवळच दूध आणण्यास जात असताना लष्कराचा पाण्याच्या टॅँकरच्या पाठीमागील भागाचा सायकलला धक्का लागून सायकलचे हॅँडल टॅँकरला अडकल्याने गगनदीप हा फरफटत जाऊन जागीच ठार झाला.

लष्कराच्या वाहनाने बालकाचा मृत्यू
नाशिकरोड : वडनेर दुमाला पाळदे मळा येथील आठ वर्षाचा मुलगा गगनदिप सुशीलकुमार यादव हा गुरुवारी सायंकाळी सायकलवरून घराजवळच दूध आणण्यास जात असताना लष्कराचा पाण्याच्या टॅँकरच्या पाठीमागील भागाचा सायकलला धक्का लागून सायकलचे हॅँडल टॅँकरला अडकल्याने गगनदीप हा फरफटत जाऊन जागीच ठार झाला. सदरचा अपघात मुलाच्या आईच्या डोळ्यादेखतच घडला. गगनदीपचे वडिल हे लष्करात सैनिक आहेत.