दुचाकींच्या धडकेत बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:57 IST2021-02-18T21:00:23+5:302021-02-19T01:57:55+5:30
त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत चिरापाली येथील चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

दुचाकींच्या धडकेत बालकाचा मृत्यू
त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत चिरापाली येथील चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
पंढरीनाथ हरी भोये (३३, रा. चिरापाली ता. त्र्यंबकेश्वर) हे पॅशनप्रो दुचाकीने (क्र. एमएच १५ एफडी २११८) संस्कार या चार वर्षाच्या मुलास पुढे बसवून हरसूलकडून नाशिककडे येत होते. हरसूल येथील कृषी कार्यालयासमोर नाशिकहून हरसूलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या होंडा शाईन दुचाकीने (क्र.एमएच १५ जीझेड ५८९१) भोये यांच्या पॅशनप्रोला जोरदार धडक दिली. या अपघातात पंढरीनाथ भोये हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या चार वर्षीय बालकास डोक्यावर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत भोये यांनी हरसूल पोलीस ठाण्यात संशयित विष्णू देवराम सुबर (रा. खैरायपाली) याच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धूम करीत आहेत.