ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात मुलाचा मृत्यू; पिता गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 21:24 IST2018-06-11T21:24:23+5:302018-06-11T21:24:23+5:30

नाशिक : ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या गंभीर अपघातात मुलाचा मृत्यू, तर पिता गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़ ११) दुपारच्या सुमारास धोंडेगाव-गिरणारे रस्त्यावरील नागलवाडी फाट्यावर घडली़ सोपान कचरू बेंडकोळी (२१, रा. धोंडेगाव, ता. नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या, तर कचरू परशराम बेंडकोळी (४५) असे जखमी पित्याचे नाव आहे़

 Child dies in tractor-bike accident; Father seriously injured | ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात मुलाचा मृत्यू; पिता गंभीर जखमी

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात मुलाचा मृत्यू; पिता गंभीर जखमी

ठळक मुद्दे नागलवाडी फाट्यावर घटना पित्यावर अतिदक्षता विभागात उपचार

नाशिक : ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या गंभीर अपघातात मुलाचा मृत्यू, तर पिता गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़ ११) दुपारच्या सुमारास धोंडेगाव-गिरणारे रस्त्यावरील नागलवाडी फाट्यावर घडली़ सोपान कचरू बेंडकोळी (२१, रा. धोंडेगाव, ता. नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या, तर कचरू परशराम बेंडकोळी (४५) असे जखमी पित्याचे नाव आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कचरू बेंडकोळी हे मुलगा सोपानसह दुचाकीवरून (एमएच १५, एफजे ४२१४) धोंडेगाव ते गिरणारे रोडने जात होते़ नागलवाडी फाट्यावर त्यांची दुचाकी व ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला़ या अपघातामध्ये दोघांच्याही डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांना चार वाजेच्या सुमारास १०८ रुग्णवाहिकेतून डॉ़ शहा यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ रुग्णालयात उपचार सुरू असताना पावणेपाच वाजेच्या सुमारास सोपान बेंडकुळे याचा मृत्यू झाला, तर पिता कचरू बेंडकुळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़

दरम्यान, या अपघाताची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

Web Title:  Child dies in tractor-bike accident; Father seriously injured