पाझर तलावात बुडून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:15 IST2021-04-10T22:56:10+5:302021-04-11T00:15:07+5:30
सुरगाणा : येथून जवळच असलेल्या भदर येथील पाझर तलावात आंघोळीसाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

योहान वार्डे
सुरगाणा : येथून जवळच असलेल्या भदर येथील पाझर तलावात आंघोळीसाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
योहान शिवा वार्डे (८) असे या मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो भदर येथील जिल्हा परिषद शाळेत दुसऱ्या ईयत्तेत शिक्षण घेत होता. वातावरणात उकाडा असल्याने शुक्रवारी (दि.९) दुपारी योहान हा मित्रांसोबत येथील पाझरतलावावर आंघोळीसाठी गेला होता. अंघोळ करीत असताना त्याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा याच पाझर तलावात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती यावेळी ग्रामस्थांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.