शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका रिक्त

By admin | Updated: March 30, 2015 00:37 IST

शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा : शहरात म्हाडाची ८२ घरे पडून

नाशिक : राज्य शासनाने कमाल जमीनधारणा कायदा रद्द केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा स्वेच्छाधिकार कोटा रद्द केला; परंतु यादरम्यान या कोट्यासाठी राखीव असलेल्या सदनिकांबाबत निर्णय न घेतल्याने शेकडो सदनिका वापराविना पडून आहे. केवळ नाशिक शहरातच म्हाडाची ८२ घरे रिकामी पडून आहेत. त्यातच न्यायालयाने अलीकडेच या कायद्यानुसार विकासकान दिलेल्या कमिटमेंट बदलता येणार नसल्याचा निकाल गेल्या जानेवारीत दिल्याने आता शासनच याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.गरिबांना माफक दरात घरे उपलब्ध करून देण्याचाच एक भाग म्हणून जमीन खरेदीवर मर्यादा घालणारा कायदा करण्यात आला. त्यातही अशा प्रकारची कमाल धारणा कायद्याअंतर्गत असलेल्या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प राबविले तर त्यातील दहा टक्के सदनिका राखीव ठेवणे बंधनकारक होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारात अशा सदनिका पत्रकार, कलावंत, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ता यांना दिल्या जात होत्या. तथापि, नागरी कमाल जमीन धारणा कायदा कितपत उपयुक्त ठरला यावर बराच खल झाला आणि अखेरीस हा कायदा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना रद्द झाला. अर्थात, त्यानंतरदेखील कायदा रद्द होण्यापूर्वी विकासकांनी शासनाला कबूल केल्याप्रमाणे त्यांना सदनिका हस्तांतरित कराव्या लागल्या होत्या. त्याबाबतदेखील निर्णय झालेला नाही. आता कमाल जमीन धारणा कायदा रद्द झाल्यानंतरदेखील राज्यशासनाचा ताबा असलेल्या अनेक मिळकती वापराविना पडून आहेत. गरिबांना घरे मिळण्यासाठी आता एक एकरपेक्षा अधिक जागेत गृहनिर्माण प्रकल्प राबविला जात असेल तर त्यातील २० टक्केसदनिका किंवा जागा म्हाडाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात अनेक सुधारणा सुचविल्या गेल्या असल्या तरी यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकार कोट्यात असलेल्या सदनिकांचा प्रश्न मात्र सुटलेला नाही.म्हाडाच्या वतीने नाशिकमध्ये अशा प्रकारच्या ८२ सदनिका वापराविना पडून आहेत. त्याबाबत शासनाने अद्याप निर्णय दिलेला नाही. म्हाडाच्या मुख्याधिकारी सरिता नरके यांनी त्यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे वापरात नसलेल्या या सदनिकांचे काय करायचे असा प्रश्न सध्या पडला आहे. असाच प्रश्न खासगी विकासकांसमोरही उभा आहे. के्रडाईचे माजी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी नाशिकमध्ये हा प्रश्न फारसा गंभीर नसून तथापि, मुंबई आणि पुण्यात मात्र हा प्रश्न आहे. नागरी जमीन कमालधारणा मर्यादेच्या कलम २० अन्वये विकासकाने कबूल केलेल्या अटीनुसार अशा प्रकारच्या सदनिका सरकारच्या ताब्यात असून, त्यावर सरकारनेच निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे सांगितले. तर क्रेडाई नाशिकचे माजी अध्यक्ष किरण चव्हाण यांनी राज्यातील नवे सरकार याबाबत निर्णय घेतील या विषयी विकासकांना अपेक्षा असल्याचे नमूद केले. (प्रतिनिधी)