विमानतळ पार्टी कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे

By Admin | Updated: February 10, 2015 01:38 IST2015-02-10T01:34:03+5:302015-02-10T01:38:52+5:30

विमानतळ पार्टी कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे

Chief Minister urged the airport party to take action | विमानतळ पार्टी कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे

विमानतळ पार्टी कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे

  नाशिक : ओझर येथील नाशिक विमानतळाचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीसाठी केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील पार्टीत सहभागी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असला तरी प्रत्यक्षात एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही. तसेच कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. विशेष म्हणजे ज्या बिल्डर्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तेच पदाधिकारी गेल्या आठवडयात पोलीस ठाण्यात चकरा मारून गेल्याचे समजते. बुधवारी (दि.११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर येत असून विमानतळावर साग्रसंगीत पार्टीत सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Chief Minister urged the airport party to take action