मुख्यमंत्र्यांनी घेतले स्वामी सागरानंद यांच्या पार्थिवाचे दर्शन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 17:12 IST2022-10-08T17:11:47+5:302022-10-08T17:12:37+5:30

नाशिकला झालेल्या बस अपघातात मृत पावलेल्या व जखमी प्रवाशांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री आले होते.

Chief Minister took darshan of Swami Sagaranand's body | मुख्यमंत्र्यांनी घेतले स्वामी सागरानंद यांच्या पार्थिवाचे दर्शन !

मुख्यमंत्र्यांनी घेतले स्वामी सागरानंद यांच्या पार्थिवाचे दर्शन !

त्र्यंबकेश्वर (नाशिक) :  अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर येथील स्वामीजींच्या आश्रमात येऊन दर्शन घेतले. त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री  दादा भुसे, मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. 

नाशिकला झालेल्या बस अपघातात मृत पावलेल्या व जखमी प्रवाशांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री आले होते.  त्र्यंबकेश्वर येथील शिंदे गटाचे प्रमुख भुषण अडसरे यांनी स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या निधनाबाबत शिंदे यांना फोन करुन माहिती दिली होती. त्यानंतर शिंदे त्र्यंबकेश्वरला आले. त्यांनी अंत्यदर्शन घेतले आणि ते परत मुंबईकडे परतले.
 

Web Title: Chief Minister took darshan of Swami Sagaranand's body