बोगस बियाणे प्रकरणी छावा संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:13 IST2020-07-24T23:20:29+5:302020-07-25T01:13:09+5:30
बोगस बियाणे तसेच कापूस खरेदी आदी प्रकरणी कृषिमंत्री दादा भुसे आणि पणन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी छावा संघटनेकडून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देताना अॅड. अलका शेळके-मोरे पाटील. समवेत निलोफर शेख, वैभव गवाल, तसलिम सय्यद आणि श्रीकांत पेखळे.
नाशिक : बोगस बियाणे तसेच कापूस खरेदी आदी प्रकरणी कृषिमंत्री दादा भुसे आणि पणन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी छावा संघटनेकडून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले.
गेल्या ७ जुलै रोजी संघटनेने याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. याच मुद्द्यावर २३ रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देऊन बोगस बियाणे संदर्भात स्मरण करून देण्यात आले. दरम्यान, प्रशासनाने
निवेदन पुढील कार्यवाहीसाठी शासन दरबारी पाठवून दिल्याचे पत्र दिले निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेला दिले असल्याची माहिती अॅड. अलका शेळके (मोरे पाटील) यांनी दिली. यावेळी निलोफर शेख, वैभव गवाल, तसलिम सय्यद आणि श्रीकांत पेखळे आदी उपस्थित होते.