शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

भरमसाठ आवक वाढल्याने टरबूज झाले स्वस्त !

By admin | Updated: March 28, 2017 01:15 IST

नाशिक : उन्हाळ्यात सर्वांना हवेहवेसे वाटणारे थंडगार लालचुटूक भरपूर गर असलेल्या कलिंगड तथा टरबूजाची पेठरोडवरील शरदचंद्र पवार मध्यवर्ती बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत.

नाशिक : उन्हाळ्यात सर्वांना हवेहवेसे वाटणारे थंडगार लालचुटूक भरपूर गर असलेल्या कलिंगड तथा टरबूजाची पेठरोडवरील शरदचंद्र पवार मध्यवर्ती बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत. बाजार समितीत रोज अकराशे ते बाराशे क्विंटल टरबुजाची आवक होत आहे. मागील आठवड्यात सरासरी ५०० ते ७०० क्विंटल आवक झाली. असून, भाव ९०० रुपये क्विंटल असा आहे. तर किरकोळ विक्रीचा भाव सात ते आठ रुपये किलो असून, एक नगाचे वजन दीड किलोपासून ते १२ किलोपर्यंत असते. त्यामुळे एक टरबूज ग्राहकाला दहा पंधरा रुपयांपासून ७० ते ८० रुपयांपर्यंत मिळते, असे बाजार समितीतील द्वारकानाथ शिंदे यांनी सांगितले. साधारणत: उन्हाळ्याच्या प्रारंभी या फळाची आवक सुरू होते अन् पावसाळा येईपर्यंत ती सुरूच राहते. यंदा मात्र जानेवारीच्या प्रारंभीच या फळाची बाजारात आवक सुरू झाली आहे. नाशिक बाजार समितीत रोज ५०० ते ७०० क्विंटल आवक होते. परंतु यंदा पावसाळा चांगला झाल्याने नदीकाठावर आणि शेतात पिकणाऱ्या या फळाचे भरघोस उत्पन्न झाले आहे. त्यामुळे आवक दुप्पट झाली आहे. औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, चाळीसगाव, मालेगाव, रायपूर आदि ठिकाणांहून नाशिक बाजार समितीत टरबुजांचे ट्रक भरून येतात. तसेच नाशिक शहरासह जिल्ह्यात या मालाचा खप होतो. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, जव्हार, मोखाडा, संगमनेर, सिन्नर, पेठ येथे या मालाची निर्यात होते. टरबुजाची आवक वाढल्याने ठोक विक्रीचे भाव कोसळले तर किरकोळ विक्रीचे भाव मात्र चढेच आहेत, असे काही ग्राहकांनी सांगितले. (प्रतिनिधी)