चारसूत्री भात लागवड सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:17 IST2020-07-10T20:52:59+5:302020-07-11T00:17:02+5:30
वेळुंजे : परिसरातील खरशेत तसेच खोरीपाडा येथे चार सूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे. हातलोंढी, राजीवनगर, खोरीपाडा, खरशेत, ...

चारसूत्री भात लागवड सुरु
वेळुंजे : परिसरातील खरशेत तसेच खोरीपाडा येथे चार सूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे. हातलोंढी, राजीवनगर, खोरीपाडा, खरशेत, निरगुडे येथील शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी सप्ताहाचा अवलंब केला असून पिकांची गुणवत्ता तसेच उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी १५ हजार हेक्टरवर भात आवणीचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे तर २७८ हेक्टर आंबा घन लागवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या कृषी संजीवनी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुका कृषी विभागाने वेगवेगळ्या अवगत शेतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांच्या बांधावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले आहे.
हरसूल तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जमतेम ५ ते १५ टक्के शेती चढ -उतारावर असल्याने या कृषी संजीवनी सप्ताहाचा फायदा होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, कृषी अधिकारी विटनोर, हरसूल मंडळ कृषी अधिकारी डॉ.संजय पाटील, कृषी पर्यवेक्षक तात्यासाहेब दिवटे, कृषी सहाय्यक अशोक कर्डेल, अशोक गायकवाड, भगवान चौधरी, संतोष गाडर, सरपंच मुरलीधर दळवी, ग्रामसेवक अलका तरवारे, हरिदास मौळे, काशिनाथ भोये आदी उपस्थित होते.
यात त्रिसूत्री कार्यक्रम, चार सूत्री भात लागवड, भात पीक कीड रोग नियंत्रण, महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड, स्व. गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, शेतीशाळा, दोरीवरील भात लागवड, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन,खत व्यवस्थापन आदी शेतकºयांच्या कल्याणकारी योजनांबाबत बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.