शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

शहरातील वाहतूक मार्गात बदल;पाचही केंद्राची वाहतूक बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 1:56 PM

नवीन आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुल, भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियम, नाशिकरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय आणि सीबीएस येथील शासकीय कन्या विद्यालय येथे मतमोजनी होणार आहे.

नाशिक : विधानसभा निवडणकूीच्या मतमोजनीसाठी शहरात पाच ठिकाणी केंद्र उभारण्यात आले आहेत. या केंद्राजवळील परिसर नो व्हेईकल झोन असणे आवश्यक असल्याने वाहतूक शाखेने या पाचही केंद्राची वाहतूक बदलली असून चालकांना पर्यायी मार्गाची वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी काढलेल्या अधिसुचनेनुसार गुरुवारी (दि.24) वाहतूक मार्गात बदल राहतील.नवीन आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुल, भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियम, नाशिकरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय आणि सीबीएस येथील शासकीय कन्या विद्यालय येथे मतमोजनी होणार आहे. मतदान झाल्यानंतर मतमोजनीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. मतमोजनी केंद्रात नागरिकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.24) सकाळी सहा ते रात्री 12 पर्यंत मतमोजनी केंद्राजवळील मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.बंद केलेले मार्ग व पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे* विभागीय क्रीडा संकुल : विभागीय क्रिडा संकुल समोरील सर्व्हिस रोड हिरावाडी टी पाँइट ते के. के. वाघ कॉलेज चौफुली पर्यंत तसेच हिरावाडी टी पाँइट ते पाटा पर्यंतच्या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील पर्यायी वाहतूक हिरावाडीकडून सर्व्हिसरोडने मुंबई आग्रा रोडवरून येणारी वाहतूक हिरावाडी काट्यामारुती चौक व स्वामी नारायण चौकाकडून इतरत्र जाईल.* कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह : किनारा हॉटेल ते वडाळा रोड पुलापर्यंत तसेच भाभानगर कडून गायकवाड सभागृहाकडे जाणारा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक नागजी सिग्नल भाभानगर मार्गे मुंबई नाक्याहून इतरत्र जाऊ शकेल. तसेच मुंबई नाक्याहून नागजी पुलाकडे येणारी वाहतूक भाभानगर मार्गे नागजी सिग्नलकडून वडाळा गाव व इतरत्र जाऊ शकेल. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक मार्गे साईनाथ चौफुली कडून इतरत्र जाऊ शकेल.* छत्रपती संभाजी स्टेडीयम : सिडको रुग्णालय ते अंबड लिंकरोड, महाले पेट्रोल पंप ते मायको हॉल व आयडीयल कॉर्नर ते हॉटेल एक्सलेन्सी मार्गावरील वाहतूक संपूर्ण बंद करण्यात आली आहे. या मार्गाऐवजी डीजीपी नगर, अंबड गाव- माऊली लॉन्स या मार्गाचा तसेच पाथर्डी फाटा, राणेनगर, लेखानगर या मार्गांवरून इतरत्र वाहतूक जाऊ शकेल.* महापालिका विभागीय कार्यालय : मुक्तीधाम चौक ते सत्कार पॉइंट या मार्गावरील दुहेरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी वाहन चालकांनी बिटको चौकाकडून सत्कार पाँइट जावे, तसेच नाशिकरोड रेल्वेस्टेशन, रिपोर्ट कॉर्नर ते सत्कार पाँइट कडून देवळाली कॅम्प, भगूरच्या दिशेने जाऊ शकतील.* शासकीय कन्या विद्यालय : सिबीएस सिग्नल ते मेहेर सिग्नल दुतर्फा वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी वाहनचालकांनी सीबीएकडून अशोकस्तंभ रविवार कारंजा, पंचवटीकडे जाणारी वाहतूक टिळकवाडी सिग्नल मार्गे जाईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीस