चांदवडला ट्रकच्या धडकेने पादचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 18:38 IST2019-03-07T18:37:12+5:302019-03-07T18:38:42+5:30
चांदवड येथील शासकीय विश्रामगृहाजवळ रस्ता ओलांडणारे भास्कर सावळीराम गायकवाड (४५) रा. चांदवड यांना अज्ञात ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले

चांदवडला ट्रकच्या धडकेने पादचारी जखमी
चांदवड : येथील शासकीय विश्रामगृहाजवळ चांदवड मनमाड चौफुलीवर रस्ता ओलांडणारे भास्कर सावळीराम गायकवाड (४५) रा. चांदवड यांना मनमाड कडून येणाऱ्या अज्ञात ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्यास जबर मारल्याने त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व प्रथमोपचार करुन अधिक उपचारासाठी मालेगाव येथे रवाना केले.
याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करीत आहेत.