चांदवडला राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह
By Admin | Updated: January 22, 2016 22:37 IST2016-01-22T22:33:12+5:302016-01-22T22:37:46+5:30
चांदवडला राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह

चांदवडला राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह
चांदवड : येथील सुरेशदादा जैन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह २०१६ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात गायन स्पर्धा, फार्मास्युटिकल अॅडव्हरटाईजमेंट व फार्मास्युटिकल मॉडेल मेकिंग स्पर्धेत सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित औषधनिर्माणशास्त्र विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमास आय.पी.ए. नाशिक शाखेचे नीरज बदलानी (संचालक, बिनिलॉन फार्मा, नाशिक), प्राचार्य संतोष तांबे, डॉ. दिलीप पाठक उपस्थित होते. यावेळी प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर, प्राचार्य डॉ. सी. डी. उपासनी यांचे मार्गदर्शन लाभले.