शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला एक लाख भाविक

By admin | Updated: October 12, 2016 00:41 IST

रेणुकामातेचे दर्शन : दसरा उत्साहात साजरा

चांदवड : शहरात विजयादशमीनिमित्त येथील कुलस्वामिनी श्री रेणुकादेवी मातेच्या मंदिरात एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.
श्री रेणुकादेवी मातेच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पालखीत श्री रेणुकामातेची प्रतिमा, सुवर्ण अलंकार, अहल्यादेवीची
प्रतिमा असते. या पालखीस मोठा बंदुकधारी पोलीस बंदोबस्त असतो. सदरची पालखी रेणुका
मंदिरातून पुरातन मनमाड-लासलगाव चौफुलीवरील श्री खंडेराव महाराज मंदिरात नेण्यात आली. यावेळी पालखीस ठिकठिकाणी सुवासिनींनी ओवाळले.
श्री रेणुकादेवी मंदिराचा गाभारा विविध फुलांनी सजावट करण्याचे काम बाळासाहेब होनराव यांनी केले.
येथील म्हसोबा चौकीवरील सप्तशृंगी देवी मंदिरातील पुजारी हौशाबाई विठ्ठल भोसले, म्हसोबा मंदिर व बाबूराव वस्ताद या दोन्हीही जागृत मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याचे पुजारी शांताबाई रानडे, म्हसोबा मंदिराचे पुजारी वसंत सखाराम अहेर यांनी व्यवस्था पाहिली तर अष्टमीला सप्तशृंगी मंदिरात घागरी फुंकण्याचा व राहाडीचा कार्यक्रम झाला.
गावातील श्री महालक्ष्मी मंदिर, गुजराथ गल्लीतील कच्छादेवी, तुळजाभवानी मंदिराची व्यवस्था वृत्तपत्र विक्रेते सोनुपंत ठाकरे, सूर्यकांत ठाकरे, जयवंत ठाकरे यांनी बघितली. कालिका मंदिराची व्यवस्था गोसावी परिवाराने बघितली. या सर्व मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी रेणुकादेवी संस्थानच्या वतीने व्यवस्थापक एम. के. पवार, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व गृहरक्षक दलाने चोख बंदोबस्त ठेवला. नऊ दिवस साजरा होणारा नवरात्रोत्सव कुठलाही अनुचित प्रकार न घडता झाल्याबद्दल संस्थानच्या वतीने पवार व पोलीस प्रशासनाच्या वतीने बहिरट यांनी भाविकांना धन्यवाद दिले. (वार्ताहर)