चांदवडला भाकपचा तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 17:05 IST2021-06-17T17:05:12+5:302021-06-17T17:05:20+5:30
चांदवड : चांदवड येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

चांदवडला भाकपचा तहसीलवर मोर्चा
चांदवड : चांदवड येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व कॉ. हनुमंत गुंजाळ, राजाराम ठाकरे, तुकाराम गायकवाड, गणपत गुंजाळ, रुपचंद ठाकरे, ताईबाई पवार, कारभारी माळी , सुरेश चौधरी, शांताराम गावीत, जयाबाई माळी, दौलत माळी, बाळू सोनवणे आदींनी केले. मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन दिले. निवेदनात सर्व नागरिकांना त्वरित मोफत लस दया, कोरोनाचा मोफत उपचार करा, पेट्रोल-डिझेल व गॅसचे दर कमी करा, जीवनावश्यक वस्तूंची महागाई कमी करा, शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करा, शेतमालाला हमी भाव देणारा कायदा मंजूर करा, संसदेत प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्या, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या, ताब्यात असलेले फॉरेस्ट प्लॉट कसणाऱ्यांच्या नावावर करा आदींसह असंख्य मागण्यांचा समावेश होता.