चांदवडला २४ हजार ५०० रुपयांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:45 IST2019-05-09T00:45:38+5:302019-05-09T00:45:50+5:30
चांदवड : येथील डावखरनगरमध्ये जगन्नाथ अहेर यांच्या प्लॉट नंबर ९ मधून चोरट्यांनी राहत्या घराचे बंद दरवाज्याची कडी कोंडा तोडून कपाटातुन सोेन्याचे मंगळसूत्र एक सोन्याची नथ असा एकूण १५५०० रुपयाचा ऐवज चोरुन नेला .

चांदवडला २४ हजार ५०० रुपयांची चोरी
चांदवड : येथील डावखरनगरमध्ये चोरीनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा डावखरनगर येथील जगन्नाथ भिकाजी अहेर या शिक्षकांच्या घरी वळविला.
जगन्नाथ अहेर यांच्या प्लॉट नंबर ९ मधून अज्ञात चोरट्यांनी राहत्या घराचे बंद दरवाज्याची कडी कोंडा तोडून घरातील कपाटातुन सोेन्याचे मंगळसूत्र किमंत रुपये १४ हजार तर एक सोन्याची नथ असा एकूण १५५०० रुपयाचा ऐवज चोरुन नेला तर दुसरी चोरी गणेश कॉलनीतील कमलेश कुमार विरेंद्र प्रसाद गुप्ता यांच्या घरी झाली. उन्हाळी सुट्टी असल्याने ते कुंटूबीय समवेत महाबळेश्वर येथे गेले होते. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती शेजारी राहणारे अभिजीत शेडगे यांच्या पत्नी वृषाली यांनी भ्रमणध्वनीद्वारे गुप्ता यांची पत्नी रितु यास सांगीतली. घरात येऊन बघतो तर सर्व सामान अस्तावस्थ पडलेले होते त्यातुन रोख रुपये सात हजार तर दोन हजार रुपयांचे चांदीचे नाणे असा एकूण ९ हजार रुपये किमंतीचा माल चोरीस गेला.