चांदोरीला पोलीस अधीक्षकांनी केला बनावट दारूचा अड्डा उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 12:20 AM2021-10-12T00:20:13+5:302021-10-12T00:20:43+5:30

सुदर्शन सारडा ओझर : निफाड तालुक्यातील चांदोरी येथे निफाड रोड येथे असलेल्या उदयराजे लॉन्स मध्ये बनावट दारूचा कारखाना पोलीस अधीक्षक ...

Chandori Superintendent of Police demolishes fake liquor den | चांदोरीला पोलीस अधीक्षकांनी केला बनावट दारूचा अड्डा उध्वस्त

चांदोरीला पोलीस अधीक्षकांनी केला बनावट दारूचा अड्डा उध्वस्त

Next
ठळक मुद्देओझर : करोडोंचा माल जप्त.,राज्याततील सर्वात मोठी कारवाई

सुदर्शन सारडा
ओझर : निफाड तालुक्यातील चांदोरी येथे निफाड रोड येथे असलेल्या उदयराजे लॉन्स मध्ये बनावट दारूचा कारखाना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पथकासह धाड टाकत बनावट दारूच्या अड्ड्यावर धाड टाकत अड्डा उध्वस्त केला.
सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सचिन पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी स्वतः येत तसुमारे एकवीस जणांच्या पथकाने धाड टाकत नाशिक औरंगाबाद रोड वर चांदोरी नजीक असलेल्या लॉन्स वर बनावट दारूच्या कारखानावर नाशिक टाकत सुमारे एक कोटींचा जवळपास रुपयांचा माल जप्त केला आहे.
लग्न मंडपाच्या सभागृहात चोही बाजूने ताडपत्री व पत्र्याच्या साहाय्याने बंदिस्त करत आत मध्ये बारा ते पंधरा जणांचे समूह स्पिरिट च्या साहाय्याने रात्रीच्या वेळेस सर्व प्रकारच्या देशी दारू बनवण्याचे काम सुरू होते.अशातच पोलीस अधीक्षक यांनी ताफ्यासह धड मारली.
या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे,संजय पाटील,प्रभाकर पवार,ज्ञानदेव शिरोळे,मुनिर सय्यद,शामराव गडाख,बंडू ठाकरे,नितीन मंडलिक, हनुमंत महाले,प्रकाश तुपलोंढे, भगवंत निकम,गणेश वराडे,नंदू काळे,विश्वनाथ काकड,सागर काकड,सतीश जगताप,मंगेश गोसावी,सुशांत मरकड,रवींद्र टरले, प्रीतम लोखंडे,किरण काकड,भूषण उन्हावणे,नौशाद शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला.

रात्रीच्या वेळी चालत असे काम
सदर घटनास्थळ हे मंगल कार्यासाठी असताना येथे मुख्य व्यासपीठावर बनावट बॉक्स रचलेले होते तर पाहुणे व जेवणावळी च्या ठिकाणी मात्र स्पिरीट व बनावट दारूचे अंदाजे नऊशे ते हजार बॉक्स तयार मालाचे आढळून आले.त्याच प्रमाणे हुबेहूब रिकामे बुच,माल बनवण्याचे साहित्य,रिकाम्या बाटल्या व बनावट मद्य बनवण्याचे इतर साहित्य आढळून आले.
सदरचे काम हे रात्रीस खेळ चाले प्रमाणे होते.दिवसा कुणालाही काहीच थांगपत्ता लागत नसे परंतु अंधार पडल्यानंतर सर्व पॅकिंग साहित्य रचून हा उद्योग सुरू होता.यामध्ये बाजारातील हुबेहूब पॅकिंग व लेबल साहित्य बघून सर्वच जण चक्रावले.ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जाते आहे.रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

फोटो:बनावट दारूच्या कारखाण्यावर धाड मारून पाहणी करताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील व पोलीस अधिकारी व कर्मचारी.
 

Web Title: Chandori Superintendent of Police demolishes fake liquor den

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.